Home देश 2 terrorists killed: पुलवामा: चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे २ दहशतवादी ठार - 2 terrorists...

2 terrorists killed: पुलवामा: चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे २ दहशतवादी ठार – 2 terrorists killed in pulwama of jammu and kashmir in encunter


श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात आज मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने त्रालमधील सिमलोहच्या पामपोश कॉलनीला घेरले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांनी माहिती देताना पुढे सांगितले की, या परिसराला घेराव घातला जात असताना तेथे लपून बसलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये गोळीबार सुरू झाला. यात एक अतिरेकी ठार झाला. आणखी एक दहशतवादी निवासी क्षेत्राकडे धावताना जवानांना दिसला. त्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी सर्व नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

मात्र, या शोधमोहिमेदरम्यान दहशतदी सापडू शकला नाही. मात्र, सुरक्षा दलाने हार न मानता लपून बसलेल्या दहशतवाद्याचा शोध सुरूच ठेवला. परंतु यावेळी सुमारे ४० लोक चकमकीच्या ठिकाणी जमले आणि त्यांनी सुरक्षा दलावर दगडफेक केली. त्यानंतर सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचे नळकांड्या सोडल्या. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जवानांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली आणि त्यांनी दहशतवाद्यांना अखेर शोधून काढले. जवानांनी या दहशतवाद्याला ठार केले.

यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. त्यात दुसरा दहशतवादीही ठार झाला. त्यांच्याकडून दोन एके रायफली, दोन पिस्तुल, पाच एके मॅगझीन आणि दोन ग्रेनेड्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

सहकार्य करण्याचे लोकांना आवाहन

पोलिस आणि सुरक्षा दलाच्या प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी झाली असून यात कोणतेही नुकसान झाले नाही. हा परिसर पूर्णपणे मोकळा होईपर्यंत पोलिसांना नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी नवीन धोरणांतर्गत दहशतवाद्यांची ओळख उघड केलेली नाही. बारामुल्ला जिल्ह्यातील शेरी भागात किंवा शहराच्या बाहेरील भागातील गेंडरबलमध्ये अधिकाऱ्यांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांचे दफन करण्यास सुरुवात केली आहे. करोनाचा संसर्ग सुरू असल्याने स्थानिक लोक प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमू नयेत आणि कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Navi Mumbai Municipal Corporation: गुड न्यूज! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही नाट्यगृहांना मिळणार भाडे सवलत – navi mumbai municipal corporation has decided take discount to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नाट्यप्रयोग सुरू व्हावेत म्हणून नाट्यसृष्टीकडून विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या प्रयत्नांना...

Recent Comments