Home देश 20 people have died in landslide: आसाममध्ये तीन ठिकाणी भूस्खलन; २० ठार,...

20 people have died in landslide: आसाममध्ये तीन ठिकाणी भूस्खलन; २० ठार, ९ गंभीर जखमी – more than 20 people have died and 9 seriously injured due to landslides in assam


गुवाहाटी: कोरोनाशी झुंज देणाऱ्या आसाममध्ये भीषण अपघात झाला आहे. संततधार पावसामुळे आसाममधील तीन भागात भूस्खलनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये महिला, मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. या अपघाताच्या घटना दक्षिण आसाम, काचार, हैलाकांडी आणि करीमगंज या तीन जिल्ह्यात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण दुर्घटनांमध्ये एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश आहे. मंगळवारी पहाटेच्या वेळी, लोक घरात झोपले असताना हे भूस्खलन झाले. झोपलेले असल्याने भूस्खलनातून लोकांना वाचता आले नाही. यात लोकांची घरे उध्वस्त झाली असून संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू झाला.

संपूर्ण कुटुंब जिवंत पुरले गेले

मंगळवारी पहाटे करीमगंज जिल्ह्यातील कालीगंज भागात ही दरडी कोसळली. हा परिसर बांगलादेश सीमेला जोडलेला आहे. येथे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली सहा जण गाडले गेले. मृतांपैकी सहा जणांपैकी पाच जण एकाच कुटुंबातील होते. घटनेच्या वेळी ते घरामध्ये झोपले होते. या दुर्घटनेत घरातील सर्वजण जिवंत पुरले गेले.

क्षणात घराचा झाले जमीनदोस्त

दुसरी घटना काचार जिल्ह्यातील कोलापूर गावात घडली. येथे दरड कोसळून सात जणांना मृत्यू झाला. मरण पावलेल्यांमध्ये ही तीन कुटुंबांतील लोकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. मरण पावलेली सर्व माणसे त्यावेळी घरी झोपली होती. डोंगराचा एक मोठा भाग तुटून तो घरावर कोसळला आणि काही क्षणातच ते घर नष्ट झाले.

मुलांचे मृतदेह पाहून बसला धक्का

तिसरी घटना हैलाकांडी जिल्ह्यात घडली. येथील भटाटबाजार गावात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या सात जणांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील होते. या सात लोकांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील होते. तर, या सहा जणांमध्ये ४ मुलांचा समावेश आहे. जेव्हा मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढले गेले तेव्हा मृत्युमुखी पडलेली मुले पाहून सर्वांना धक्का बसला.

मुसधार पाऊस थांबत नाही

बंगालच्या उपसागरातून दक्षिण-पश्चिम वाऱ्याचा जोरदार प्रवाह आणि इतर भौगोलिक कारणांमुळे आसाममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बर्‍याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. ईशान्य भारतात सर्वाधिक पाऊस मे आणि त्यानंतर जूनमध्ये होतो.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

oppo a15: ओप्पोचा हा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून मोठी कपात – oppo a15 gets a rs 1,000 price cut in india, know new...

नवी दिल्लीः ओप्पोने आपला बजेट स्मार्टफोन OPPO A15 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता १० हजार रुपयांपेक्षा कमी...

Recent Comments