Home क्रीडा 2011 wc final fixing probe: २०११चा वर्ल्ड कप भारताला विकला; संगकाराला समन्स!...

2011 wc final fixing probe: २०११चा वर्ल्ड कप भारताला विकला; संगकाराला समन्स! – 2011 wc final fixing probe former sri lanka captain kumar sangakkara summoned


कोलंबो: २०११ साली भारतात झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना फिक्स झाला होता. या प्रकरणी श्रीलंकेत सुरू असेलल्या तपास पथकाने माजी कर्णधार कुमार संगकारा याला समन्स बजावले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ विकेटनी पराभव करत विजेतेपद मिळवले होते. भारताच्या या विजेतेपदावर श्रीलंकेच्या माजी क्रीडमंत्र्यांनी खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

वाचा- करोनाच्या राजधानीत IPL रंगणार? बीसीसीआयचा धाडसी विचार!

भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यावेळी महिंदनंदा अळूठगमगे हे लंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी न्यूज फर्स्टला दिलेल्या मुलाखतीत वर्ल्ड कपमधील हा सामना फिक्स झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर २०११च्या लंकेच्या वर्ल्ड कप समितीचे प्रमुख असेलल्या अरविंदा डिसिल्वाने याची चौकशी करण्याची मागणी केली होती.

वाचा- क्रिकेटचा कोच गेला सासऱ्याच्या अंत्यसंस्काराला, आता स्वतःवरच येणार ‘ही’ वेळ

या आरोपांच्या पाश्वभूमीवर लंकेच्या क्रीडा मंत्रालयाचे सचिव केडीएस रुवानचंद्रा यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे म्हटले होते. या प्रकरणी काल माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती प्रमुख डिसिल्वा आणि माजी फलंदाज उपल तरंगा यांची साक्ष घेण्यात आली. आता आज पोलिस कुमार संगकाराची साक्ष नोंदवणार आहेत.

वाचा- IPL:एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज; अव्वल स्थानी हा भारतीय!

भारताकडून पराभव झालेल्या अंतिम सामन्यात संगकारा श्रीलंकेचा कर्णधार होता. प्रथम फलंदाजी करत त्यांनी २७५ धावांचे आव्हान दिले होते. भारताने गौतम गंभीर (९७) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद ९१) यांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. काल डिसिल्वाची चौकशी पथकाकडून तब्बल सहा तास चौकशी केली. डिसिल्वा हे २०११च्या श्रीलंकेच्या संघाचे मुख्य निवड समितीचे प्रमुख होते.

वाचा- फक्त ५ दिवसाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर; १६ व्या वर्षी खेळली अखेरची कसोटी!

अळूठगमगे यांनी अंतिम सामना फिक्स झाल्याचा आरोप केला होता तेव्हा संगकाराने ते आरोप फेटाळून लावले होते. त्याने अळूठगमगे यांच्याकडून फिक्सिंग झाले असल्यास त्याचे पुरावे द्या अशी मागणी केली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Metro News: पहिलीच स्वदेशी मेट्रो २७ जानेवारीला मुंबईत – first Indigenous Metro Will Be In Mumbai On 27 January | Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईलाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे...

Recent Comments