Home ताज्या बातम्या 24 तासात दुसरी धक्कादायक घटना! 26 दिवसांच्या चिमुकलीच्या पोटावर दिले चटके amravati...

24 तासात दुसरी धक्कादायक घटना! 26 दिवसांच्या चिमुकलीच्या पोटावर दिले चटके amravati superstition-injury on 26 days old baby stomach melghat mhkk | News


मेळघाटातील आदिवसी पाड्यावर आजही अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं

अमरावती, 20 जून : कोरोनाचं संकट असतानाच आता अंद्धश्रद्धेचा विळखाही अधिक घट्ट होत आहे हे सांगणार अघोरी प्रकार समोर आला आहे. मेळघाटातील आदिवसी पाड्यावर आजही अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पोटाचा आजार बरा करण्यासाठी 26 दिवसांच्या नवजात शिशुला चटके दिल्याची 24 तासांत दुसरी घटना समोर आली आहे. याआधी 8 महिन्यांच्या बाळासोबत हा प्रकार घडला होता.

धक्कादायक बाब म्हणजे बारुगव्हाण या गावातील 26 दिवसाच्या चिमुकलीला पोट फुगल्यानं गरम सळीने चटके देण्याचा अघोरी प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. जखमी असलेल्या या चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोटफुगी सारख्या आजारांवर पोटाला गरम चटके देणं हा संतापजनक प्रकार शासनाने मोडीत काढावा अशी भावना सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे. तर अश्या अघोरी प्रथा चालविणाऱ्या बुवा बाजी करणाऱ्या मांत्रिकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

हे वाचा-शेतकरी वडिलांनी घेऊन दिला नाही टॅब, नाराज विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

अमरावती जिल्हयातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा या गावामध्ये जाणू सज्जू तोटा हिच्या 8 महिन्यांच्या बाळाला पोटफुगी झाल्यानंतर त्याला आई-वडिलांनी भुमकाकडे (भगत बुवा) नेलं होतं. भुमकानं चिमुरड्याच्या संपूर्ण पोटावर गरम विळ्याने चटके दिले. या प्रकाराला डंबा असं संबोधलं जातं. भरारी पथकाला याची महिती मिळताच 8 महिन्यंच्या श्यामला वैद्यकीय उपचारार्थ हलविले तर आई वडिलांना विचारणा केली असता हा प्रकार समोर आला.

तर दुसरीकडे याच बुवा बाजीमुळे एका गर्भवती महिलेला देखील आपल्या प्राणाला मुकावे लागलं आहे. मेळघाटमध्ये कुपोषणाची मुख्य समस्या असताना येथील आदिवासी अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्यास प्रशासन अजुन यशस्वी झालेलं नाही, अशी माहिती अंनिसचे हरीष केदार यांनी सांगितलं आहे.

हे वाचा-अरेरे! बैलगाडीसह शेतकरी पती-पत्नी ओढ्यात गेले वाहून

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jun 20, 2020 07:39 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments