Home ताज्या बातम्या 25 वर्षाच्या तरुणीला जमणार नाही ते सुष्मिता सेनने 45व्या वर्षी केलं; फिटनेस...

25 वर्षाच्या तरुणीला जमणार नाही ते सुष्मिता सेनने 45व्या वर्षी केलं; फिटनेस पाहून थक्क व्हाल ! Bollywood-actress-sushmita-sen-shared-video-on-instagram-look-at-her-fitness-at-age-of-45-mhaa | News


अभिनेत्री सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) वाढदिवस नुकताच झाला. तिला चाहत्यांनींही सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांना धन्यवाद देण्यासाठी अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यातचा तिचा फिटनेस पाहून तुम्ही थक्क व्हाल.

मुंबई, 21 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) नुकताच आपला 45 वा वाढदिवस साजरा केला. या वयातही सुष्मिता अतिशय फिट आणि सुंदर दिसते. सुष्मिताचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl), तिच्या मुली आणि जवळच्या मित्रांनी तिचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. या हरहुन्नरी अभिनेत्रीला सोशल मीडियावरुनही तिच्या चाहत्यांनी खूप शुभेच्छा दिल्या. त्यांचे आभार मानण्यासाठी सुष्मिताने एका भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये सुष्मिता वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सुष्मिता रोबला उलटी लटकली आहे. 25 वर्षाच्या तरुणीलाही कदाचित जमणार नाही ते सुष्मिता वयाच्या 45 व्या वर्षी अगदी सहजरित्या करत आहे. सुष्मिताचा वर्कआऊट पाहून भलेभले थक्क झाले आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सुष्मिताने असं लिहीलं आहे की, ‘मी 45 वर्षाची झाले आहे याचा मला अभिमान आहे. जवळजवळ 2 दशकं तुमच्या प्रेमाची शक्ती माझ्या पाठिशी आहे अशी माझी खात्री आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेले आहे. तुमच्या प्रेमामुळे मला नेहमीच शक्ती मिळते.’

सुष्मिता सेनचा हा व्हिडीओ अनेकांनी लाइक केला आहे. त्यावर भरभरुन कॉमेंट्सही येत आहेत.
सुष्मिता सेन आयुष्य भरभरुन जगणाऱ्या व्यक्तींपैकी एक अभिनेत्री आहे. सुष्मिताचं सौंदर्य आणि तिच्या अभिनयामुळे देशभरात तिचे अनेक चाहते आहेत. सुष्मिता सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते.


Published by:
Amruta Abhyankar


First published:
November 21, 2020, 1:37 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vegetable sellers in mumbai: २० लाख कुटुंबे संकटात – 20 lakh families vegetable seller and workers in crisis due to discussion among people over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई नगरीला धान्य व भाजीचा पुरवठा करण्यासाठी २० लाखांहून अधिक विक्रेते, कामगार मेहनत घेतात. आता पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाल्याने...

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

Recent Comments