Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल 3gb daily data plans: दर दिवशी 3GB डेटा देणारे मस्त प्लान, फक्त...

3gb daily data plans: दर दिवशी 3GB डेटा देणारे मस्त प्लान, फक्त ३४९ रुपयांपासून सुरू – 3gb daily data plans from reliance jio, airtel and vodafone start at rs 349


नवी दिल्लीः लॉकडाऊनमध्ये १.५ किंवा २ जीबी डेटा पुरेसा नाही. जर तुम्हाला दररोज ३ जीबी डेटा प्लान हवा असेल तर रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया कंपनीचे ३ जीबी डेटा देणारे अनेक प्लान बाजारात उपलब्ध आहेत. या प्लानमधील तुम्ही कोणताही एक प्लान निवडू शकता.

वाचाः BSNL युजर्संसाठी गुड न्यूज, ३१ मे पर्यंत प्रत्येक कॉलवर कॅशबॅक

रिलायन्स जिओ
जिओने आपल्या युजर्संसाठी दररोज ३ जीबी डेटाचे दोन प्लान आणले आहेत. जिओचा २८ दिवसांच्या वैधतेसह ३ जीबी डेटाटा एक प्लान आहे. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देणाऱ्या या प्लानमध्ये अन्य नेटवर्कवर कॉलसाठी १००० मिनिट्स मिळतात. रोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानची किंमत ३४९ रुपये आहे.

जिओचा आणखी एक प्लान ९९९ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. दररोज ३ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस दिले जातात. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३ हजार मिनिट्स दिले जातात. या प्लानवर जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः शाओमी ते सॅमसंगपर्यंत लॉकडाऊनमध्ये हे स्मार्टफोन स्वस्त

भारती एअरटेल
एअरटेलकडून दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे दोन प्लान आहेत. २८ दिवस वैधता असलेल्या या प्लानची किंमत ४०१ रुपये आहे. या प्लानमध्ये युजर्संना Disney+Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात.

दुसरा प्लान ५५८ रुपयांचा आहे. यात दररोज ३ जीबी डेटा मिळतो. तसेच झी ५ चे सब्सक्रिप्शन आणि मोबाइलसाठी फ्री अँटी व्हायरस मिळतो. अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० फ्री एसएमएस मिळणाऱ्या या प्लानची वैधता ५६ दिवस आहे.

वाचाःफेसबुकवरून आता एकाचवेळी करा ५० जणांना व्हिडिओ कॉलिंग

व्होडाफोन-आयडिया
या युजर्संना ३ जीबी डेटा देणारे अनेक प्लान आहेत. डबल डेटा ऑफरच्या मदतीने कंपनी ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा देते. आधी या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा मिळत होता. डबल डेटा ऑफरसह रोज ३ जीबी डेटा होतो. या प्लानची वैधता ८४ दिवस असून या प्लानमध्ये व्होडाफोन प्ले आणि झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

डबल डेटा देणारा दुसरा प्लान ३९९ रुपयांचा आहे. यात ३ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. यात व्होडाफोन प्ले आणि झी५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. दोन्ही प्लानवर सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. दोन्ही प्लान काही निवडक सर्कलमध्ये दिले जात आहेत.

कंपनीकडून देशभरात आणखी दोन प्लान दिले जा आहेत. यात रोज ३ जीबी डेटा दिला जातो. ५५८ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवस, ३९८ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवस वैधता आहे. दोन्ही प्लानवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० फ्री एसएमएस सोबत व्होडाफोन प्ले आणि झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाःReliance Jio: वर्क फ्रॉम होमसाठी बेस्ट प्लान्स, ७३० GB पर्यंत डेटा, अन्य फायदेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sudhir mungantiwar: ‘एकनाथ शिंदे, तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता’ – eknath shinde has the potential to be chief minister says sudhir mungantiwar

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकाही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे चर्चेत आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पुन्हा नवे वक्तव्य करून...

Chloe Zhao: आशियाचा सन्मान : क्लोई जाओ – chloe zhao is becoming the first asian woman to ever win the prize for best director

'करुणा सर्व बंधने पार करते आणि मग तुमची वेदना माझी वेदना बनते...' गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांनी याच कार्यक्रमात व्यक्त...

LIVE : मुंबईसाठी आरोग्य विभागाचं मोठं पाऊल, आता 3 ऐवजी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण | News

7:04 am (IST) विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा चर्चेचा दुसरा आणि अंतिम दिवस चर्चेला मुख्यमंत्री उद्धव...

Recent Comments