Home क्रीडा 4 consecutive test century: द्रविडच्या चार शतकानंतर 'त्या' विक्रमाच्या जवळ कोणी पोहोचू...

4 consecutive test century: द्रविडच्या चार शतकानंतर ‘त्या’ विक्रमाच्या जवळ कोणी पोहोचू शकलं नाही! – cricket record rahul dravid 4 consecutive test century but could not break the everton weekes


नवी दिल्ली: वेस्ट इंडिज क्रिकेटचे पितामह सर एव्हर्टन वीक्स यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वीक्स यांच्या नावावर सलग पाच शतक करण्याचा विक्रम आहे. गेल्या ७० वर्षापासून हा विक्रम कोणालाही मोडता आला नाही आणि या विक्रमाच्या जवळ फक्त एक फलंदाज पोहचू शकला.

क्रिकेट विश्वात गेल्या ७० वर्षात व्हीव्ह रिचर्ड्स पासून ते सचिन तेंडुलकर पर्यंत अनेक दिग्गज फलंदाज झालेत. पण या कोणालाही वीक्स यांच्या विक्रमाजवळ पोहोचता आले नाही. वीक्स यांच्या पाच शतकाजवळ पोहोचू शकलेला एकमेव फलंदाज म्हणजे भारतीय क्रिकेट संघाची वॉल राहुल द्रविड होय. क्लाइड वाल्कॉट आणि फ्रॅक वारेल यांच्यासह वेस्ट इंडिज क्रिकेटमधील प्रसिद्ध डब्ल्यू मधील वीक्स यांचे बुधवारी निधन झाले.

वाचा- २०११चा वर्ल्ड कप भारताला विकला; संगकाराला समन्स!

वीक्स यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सलग पाच डावात शतक करण्याचा विक्रम आहे. जो गेल्या ७० वर्षात मोडला गेला नाही. वीक्स यांनी ४८ कसोटी सामन्यात ५८.६च्या सरसरीने ४ हजार ४५५ धावा केल्या. यात १५ शतकांचा समावेश होता. त्यांनी मार्च १९४८ मध्ये इंग्लंडविरुद्ध किंग्सटन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात १४१ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला. तेव्हा त्यांनी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील सलग चार डावात १२८, १९४, १६२ आणि १०१ धावा केल्या. सहाव्या डावात ते शतकाच्या जवळ पोहोचले होते. पण चेन्नईत झालेल्या त्या सामन्यात ते ९० धावांवर बाद झाले.

वाचा- सर, तुमच्याबद्दल खूप काही ऐकले होते; सचिन झाला भावूक!

वीक्स यांनी तेव्हा ऑस्ट्रेलियाचे जॅक फिंगलटन (१९३६) आणि दक्षिण आफ्रिकेचे अॅलन मेलविले (१९३९-१९४७) यांच्या सलग चार शतकांचा विक्रम मागे टाकला. वीक्स यांच्या विक्रमाला गेल्या ७० वर्षात एकच खेळाडू आव्हान देऊ शकला आणि तो म्हणजे भारताचा राहुल द्रविड होय. द्रविडने २००२मध्ये इंग्लंड दौऱ्यात चार कसोटी सामन्यात १००.३३च्या सरासरीने ६०२ धावा केल्या. यात नॉटिंघम येथे ११५, लीड्स येथे १४८ आणि ओव्हलमध्ये २१७ धावांचा समावेश होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला. तेव्हा द्रविडने मुंबईत झालेल्या पहिल्या कसोटीत शतकी खेळी केली. या सामन्यात रिटायर्ड हर्ट होण्याआधी द्रविडने १०० धावा केल्या. कसोटीत सलग चार शतक करणारा तो चौथा फलंदाज ठरला. त्यानंतर १७ ऑक्टोबर पासून चेन्नईत सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात तो ११ धावांवर बाद झाला. जर्मेन लॉसनच्या इनस्विंगर चेंडूवर तो बोल्ड झाला. १९४८ नंतर सलग चार डावात चार शतक करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

दरम्यानच्या काळात अन्य काही फलंदाज आहेत ज्यांनी सलग तीन शतक झळकावली. यात कुमार संगकारा, सुनील गावस्कर, अरविंद डिसिल्वा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येक दोन वेळा सलग तीन शतक केलीत. भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने २०१७ साली कोलकातामध्ये नाबाद १०४, नागपूरमध्ये २१३ आणि दिल्लीत २४३ धावा केल्या. पण त्यानंतर तो ५० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशाने याने गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पाकिस्तानविरुद्ध १८५, १६२ आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध १४३ धावा केल्या. चौथ्या डावात तो अर्धशतक करून माघारी परतला.

वाचा- जेव्हा रोहितने बांगलादेशला पळवून पळवून मारले; पाहा व्हिडिओ!

वीक्स यांच्या बाबत बोलायचे झाले तर त्यांनी भारतीय गोलंदाजांना नेहमी अडचणीत आणले. भारताविरुद्धच्या १० कसोटी सामन्यात १०६.७८च्या सरासरीने त्यांनी १ हजार ४९५ धावा केल्या. यात ७ शतकांचा समावेश आहे. वीक्स यांच्या करिअरमधील २०७ ही सर्वोच्च खेळी भारताविरुद्ध आहे.

वाचा- मनोहर यांचा राजीनामा म्हणजे, नको असलेल्या गोष्टीपासून सुटका!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ambernath-Karjat Railway Services: Local Train Latest News: रूळ दुरुस्ती करणारे मशिन घसरले; एक ठार, तीन कामगार जखमी – central railway service disrupted between ambernath...

ठाणे: रेल्वे रूळ दुरुस्त करणारी मशिन रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर मध्य...

Sharad Pawar Warns Modi Government After Violence In Delhi – Delhi Violence: ‘पंजाबला पुन्हा अशांत करण्याचं पातक मोदी सरकारनं करू नये’ | Maharashtra Times

मुंबई: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'बळाचा वापर करून आंदोलन चिरडलं तर...

fake websites: आधार कार्ड, वोटर कार्ड आणि पॅन कार्डच्या ‘या’ वेबसाइट्पासून सावध राहा, पाहा संपूर्ण यादी – fake websites: aadhaar voter and pan card...

नवी दिल्लीः कोणत्याही गोष्टी प्रसिद्ध झाल्या की, त्याच्या नावावर फसवणूक करण्याचे प्रकार सुरू होतात. भारतात आधार कार्ड खूपच आवश्यक बनले आहे. आधार कार्डच्या...

Recent Comments