Home देश पैसा पैसा 40% Decline In Corporate Revenue? - लाॅकडाउन: कंपन्यांच्या उत्पन्नात मोठी घट

40% Decline In Corporate Revenue? – लाॅकडाउन: कंपन्यांच्या उत्पन्नात मोठी घट


वृत्तसंस्था, नवी दिल्ली : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशातील आर्थिक चक्रावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असल्याचे भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) म्हटले आहे. सीआयआयने देशातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे एक सर्वेक्षण जाहीर केले. सर्वेक्षणात सहभागी ६५ टक्के कंपन्यांच्या सीईओंच्या मते एप्रिल ते जूनच्या तिमाहीमध्ये कंपन्यांच्या उत्पन्नात ४० टक्क्यांहून अधिक घसरण होण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुस्ती दीर्घ काळ तशीच राहण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी ४५ टक्के सीईओंच्या मते देशव्यापी लॉकडाउन हटल्यानंतर अर्थव्यवस्था सामान्य स्थितीमध्ये येण्यासाठी एक वर्षापासून अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणामध्ये ३००पेक्षा अधिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली होती. त्यापैकी ६६ टक्क्यांहून अधिक सीईओ सूक्ष्म, लघु और मध्य उद्योगांतील आहेत.

१५ ते ३० टक्के कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
उद्योग बंद करण्यात आल्याने सर्वेमध्ये सहभागी झालेल्या निम्म्यापेक्षा अधिक सीईओंच्या मते लॉकडाउन मागे घेण्यात आल्यानंतर संबंधित क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येण्याची शक्यता आहे. ४५ टक्के सीईओंच्या मते जवळपास १५ ते ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. सर्वेमध्ये सहभागी ६६ टक्के अर्थात दोन तृतीयांश सीईओंच्या मते आतापर्यंत त्यांच्या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केलेली नाही.

२५ मार्चपासून लॉकडाउन
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी २५ मार्चपासून राष्ट्रव्यापी लॉकडाउन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने बंदचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवला आहे. सीआयआयच्या मते या बंदचा उद्योगांवर विपरित परिणाम झाला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाबाबत बोलायचे झाल्यास ३३ टक्के कंपन्यांच्या मते लॉकडाउनमुळे त्यांच्या उत्पन्नावर ४० टक्क्यांहून अधिक परिणाम झाला आहे. ३२ टक्के कंपन्यांच्या मते त्यांच्या उत्पन्नात २० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments