Home देश पैसा पैसा aadhaar on dark net: झोप उडवणारी बातमी; डार्क नेटवर भारतीय आधार-पॅन कार्डची...

aadhaar on dark net: झोप उडवणारी बातमी; डार्क नेटवर भारतीय आधार-पॅन कार्डची विक्री! – on dark net more than one lakh persons aadhaar and passport copies available for sale


नवी दिल्ली: देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सुरक्षिततेला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. जवळपास एक लाखाहून अधिक भारतीय नागरिकांचे आधार कार्ड , पॅन कार्ड आणि पासपोर्टसह अन्य राष्ट्रीय ओळख असलेल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी डार्क नेट वर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहे. सायबर सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या एका कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. या बातमीमुळे खळबळ उडाली आहे.

वाचा- या कंपनीसाठी करोना ठरले वरदान; उत्पन्न झाले दुप्पट!

सायबर सुरक्षेसंदर्भात माहिती देणाऱ्या सायबल या कंपनीच्या रिपोर्टनुसार, भारतीय नागरिकांची माहिती सरकारी यंत्रणेकडून नव्हे तर अन्य तिसऱ्या यंत्रणेकडून चोरी झाल्याची शक्यता आहे. आम्ही अशा एका डार्क नेट सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहोत जी एक लाखाहून अधिक भारतीय नागरिकांच्या राष्ट्रीय ओळख पत्रा संदर्भातील माहितीची विक्री करत आहे. सर्व साधारणपणे आम्ही अशा प्रकारच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करतो. पण संबंधित व्यक्तीने जी माहिती दिल्या त्यामुळे उत्सुकता वाढली. त्याने भारतातील विविध भागातील एक लाखाहून अधिक नागरिकांच्या कागदपत्रांची माहिती पुरवण्याचा दावा केला.

वाचा- गुंतवणूकदारांची लागली रांग; जिओमध्ये येणार आखाती पैसा!

सायबलच्या रिसर्च टीमने संबंधिक व्यक्तीकडे १ हजार भारतीय नागरिकांची कागदपत्रे मिळवली आणि ती भारतीय व्यक्तींची असल्याचे तपासून पाहिले. ही सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपी स्वरुपात आहेत. कोणत्या तरी एका कंपनीच्या डेटाबेसमधून याची चोरी केल्याची शक्यता सायबलने व्यक्त केली आहे. आपल्या ग्राहकांबद्दल जाणून घ्या (KYC) मधून ही माहिती घेतल्याचे दिसते.

वाचा- ७४ कर्मचारी झाले करोडपती; CEOचे पॅकेज ३९ टक्क्यांनी वाढले!

डार्क नेट म्हणजे काय?

डार्क नेट हा इंटरनेट असा भाग असतो जो सामान्य सर्चमध्ये येत नाही. याचा वापर करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची गरज असते. सर्व साधारणपणे तस्करी, दहशतवादी आणि अन्य अवैध कामासाठी याचा वापर केला जातो. अनेक वेळा संवेदनशील अथवा गोपनिय माहिती पाठवण्यासाठी याचा करण्यात येतो.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Hingulambika Devi Temple: साडेतीनशे वर्षांचा इतिहास; देवीचे मूळ पाकिस्तानात – three and a half hundred years of history of the hingulambika devi temple

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहराच्या मध्यवस्तीतील म्हणजे रंगारगल्लीतील श्री हिंगुलांबिका देवीच्या मंदिराला ३५० वर्षांचा इतिहास आहे. यंदा करोना परिस्थितीमुळे प्रथमच देवीची मिरवणूक निघणार नाही.नवरात्रात...

Thane: Thane: कामाचे पैसे न दिल्याने प्लंबरने केली कंत्राटदाराची हत्या – man killed contractor at ghodbunder in thane

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कामाचे १२ हजार रुपये न दिल्याने प्लंबरने कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर भागात घडली. हत्येनंतर परराज्यात पळून...

Donald Trumps Filthyair Comment On India, Howdy Modi Trending On Twitter – डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरच्या टिप्पणीनंतर #HowdyModi चा ट्रेन्ड

नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान वारंवार भारताचाही उल्लेख होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल...

Recent Comments