Home शहरं मुंबई Aaditya Thackeray : देशभरात शिवसेना शाखांचा आवाज बुलंद करा: आदित्य ठाकरे -...

Aaditya Thackeray : देशभरात शिवसेना शाखांचा आवाज बुलंद करा: आदित्य ठाकरे – Shiv Sena Leader Aaditya Thackeray Address Shivsainik On Shivsena 54th Foundation Day


मुंबई: ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचं ध्येय आहे. राज्यातील सत्ता हातात घेतल्यापासून आपण १०० टक्के समाजकारणच करत आलो आहोत. आपण आपल्या ध्येयापासून ढळलेलो नाही, असं सांगतानाच आता महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात शिवसेनेच्या शाखांचा आवाज बुलंद करा, असं आवाहन शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं. आदित्य यांच्या या आवाहनातून शिवसेनेने आता पक्षाचा विस्तार देशभर करण्याचा संकल्प सोडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.

शिवसेनेच्या आज ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी झुम अॅपवरून शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा शिवसेनेचा हा पहिलाच वर्धापन दिन होता. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना देशभर शिवसेनेच्या शाखा निर्माण करण्याचा कानमंत्र दिला.

राजकारण करण्यासाठी सत्ता हातात घेणं हे आपलं ध्येय कधीच नव्हतं. त्यामुळे सत्ता हातात घेतल्याच्या पहिल्या दिवसांपासून आपण सामाजिक निर्णय घ्यायला सुरुवात केली. निवडणूक काळात जनतेला दिलेली वचन पूर्ण करायला आपण सुरुवात केली. तुमच्या साथीने आपण पाच दशके जनतेची सेवा केली. सेवेचं हे व्रत आपल्याला अखंड सुरू ठेवायचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

भारत फास आवळणार; मोदी सरकार चीनचं नाक दाबून तोंड उघडणार

‘प्रथम ती’ हा कार्यक्रम आधी आपण हाती घेतला होता. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता आपल्याला ‘गाव तिथे शाखा’ हा उपक्रम हाती घ्यायचा आहे. हे उपक्रम राबवताना केवळ महाराष्ट्रावरच लक्ष केंद्रीत करून चालणार नाही. तर देशातल्या प्रत्येक राज्यात आपल्या शिवसेनेची शाखा असलीच पाहिजे. त्यासाठी कामाला लागा. देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या शाखेचा आवाज बुलंद करा, असंही ते म्हणाले.

सीएमच्या पाया पडणारा विरोधी पक्षनेता राज्यानं पाहिलाय; थोरातांचं जोरात उत्तर

दरम्यान, करोना संकटामुळे शिवसेनेने सत्ता आल्यानंतरही वर्धापन दिनाचा जाहीर कार्यक्रम घेतला नाही. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फक्त पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह काही मोजक्या नेत्यांनी झुम अॅपवरून संवाद साधला. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही घोषणेशिवाय आणि जल्लोषाशिवाय शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक किंवा ट्विटर लाइव्हवरून सर्वांशी संवाद साधतील असं शिवसैनिकांना वाटत होतं. अनेक शिवसैनिक फेसबुक अकाऊंट ओपन करून भाषणाची अतुरतेने वाटही पाहत होते, मात्र त्यांचा पुरता हिरमोड झाला.

राजनाथ सिंह मॉस्कोला जाणार; चीनी नेत्यांना भेटणार नाहीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Navale Bridge: पुण्यात नवले पुलाजवळ इतके अपघात का होतात?; कारण सापडलं! – various works are underway to prevent accidents near navale bridge

हायलाइट्स:नवले पुलाजवळील अपघात का होतात, याचे झाले सर्वेक्षण.तीव्र उतारावर जड वाहने बंद करून चालवली जात असल्याचे उघड.अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर हाती घेतली कामे.पुणे: पुण्यातीलनवले...

pune girl death case: pune girl death case : पुण्यातील ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूच्या बातम्यांविषयी उच्च न्यायालयाचे निर्बंध – high court restrictions on media trial...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पुण्यात मागील महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तरुणीचा झालेला मृत्यू ( pune girl death case )...

Recent Comments