Home शहरं मुंबई aaditya thackeray: वानखेडे, ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोविड सेंटर नाहीच: आदित्य ठाकरे - wankhede...

aaditya thackeray: वानखेडे, ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोविड सेंटर नाहीच: आदित्य ठाकरे – wankhede and brabourne stadium will not turn into quarantine centre, says aaditya thackeray


मुंबई: वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोविड सेंटर उभारण्याची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी फेटाळून लावली आहे. पावसाळ्यात मैदानांवर चिखल साचण्याची शक्यता असल्याने कोणतंही मैदान कोविड सेंटरसाठी ताब्यात घेण्यात येणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून ही मागणी केली होती. मुंबईत करोना रोखण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करायला हवा. क्वॉरंटाइन सुविधा देण्यासाठी आपण वानखेडे स्टेडियम ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ही चांगली गोष्ट आहे. मग वानखेडेसह ब्रेबॉर्न स्टेडियमही का ताब्यात घेतलं जात नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. तर मरीन ड्राइव्ह सिटीझन असोसिएशनने वानखेडेवर क्वॉरंटाइन सेंटर उभारण्यास विरोध केला होता. पावसाळ्यात या मैदानावर चिखल होऊन आरोग्य सेवेची दाणादाण उडून परिसरात रोगराई पसरू शकते, अशी भीती व्यक्त करतानाच केंद्राच्या गाइडलाइननुसार रहिवासी विभागात क्वॉरंटाइन सेंटर उभारण्यास मनाई करण्यात आलेली आहे. असं असताना वानखेडेचा क्वॉरंटाइन सेंटरसाठी ताबा का घेण्यात येत आहे? असा सवाल या असोसिएशनने केला आहे.

राज्यातील लॉकडाऊनमध्ये ३१ मेपर्यंत वाढ; नवी नियमावली उद्या

तर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून कोणतंही स्टेडियम ताब्यात घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. पावसाळ्यात खुल्या मैदानावर चिखल साचला जातो. त्यामुळे टणक पृष्ठभूमी असलेली जमीन क्वॉरंटाइनसाठी गरजेची आहे. त्या दिशेने आपण पावलं उचलत आहोत, असं आदित्य यांनी म्हटलं आहे. तर मैदानांवर चिखल साचत असल्याने पावसाळ्यात मैदाने घेणं योग्य नसल्याचं चहल यांनी म्हटलं आहे. आम्ही दुसऱ्या आणि चांगल्या पर्यायांचा शोध घेत आहोत, असंही ते म्हणाले.

Live: अकोल्यात ३२ करोनाबाधित सापडले

करोनामुळे कर्जबाजारी; उद्योगांना एक वर्ष दिवाळखोरीपासून संरक्षणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Rahul Gandhi: राजस्थानमधील काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा होणार अध्यक्ष? – congress conclave may be held in rajasthan to reinstall rahul gandhi as congress...

नवी दिल्लीः नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी ( rahul gandhi ) यांच्या हाती जातील. राजस्थानमध्ये फेब्रुवारी...

Recent Comments