Home महाराष्ट्र aaditya thackeray birthday: काकांपाठोपाठ आदित्य ठाकरेंनीही टाकली वाढदिवसासंबंधी पोस्ट - state environment...

aaditya thackeray birthday: काकांपाठोपाठ आदित्य ठाकरेंनीही टाकली वाढदिवसासंबंधी पोस्ट – state environment minister aaditya thackeray won’t celebrate his birthday amid covid crisis


मुंबई: वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केल्यानंतर आता शिवसेनेचे युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिक, मित्रमंडळी व हितचिंतकांना अशाच प्रकारचं आवाहन केलं आहे. जिथे असाल तिथूनच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद द्या, असं आदित्य यांनी म्हटलं आहे. (Aaditya Thackeray Birthday)

वाचा: मी खरंच भाग्यवान आहे; राज ठाकरे झाले भावूक

उद्या, १३ जून रोजी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून दरवर्षी अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी झुंबड उडते. मात्र, यंदा करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हा निर्णय जाहीर केला असून शिवसैनिकांना आवाहनही केलं आहे.

‘माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्यात. होर्डिंग्ज, हार-तुरे आणि केकचा खर्च टाळून त्याचे पैसे करोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी खर्च करा किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या. माझ्या वाढदिवसानिमित्तानं हे एक सत्कार्य होईल. त्याचा मला निश्चितच आनंद असेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही: उद्धव ठाकरे

‘महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण जगावरच करोनाचे संकट आहे. गेले दोन-तीन महिने आपण सगळे एकत्रितपणे या संकटाविरुद्ध लढा देत आहोत. करोनावर मात करणे हेच आपले सर्वांचे ध्येय आहे. त्यामुळं प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करू या. तुम्ही सर्वजण करोनापासून स्वत:ची काळजी घ्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल,’ असंही आदित्य यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. त्याऐवजी करोनामुळं अडचणीत असलेल्या लोकांना मदत करा, असं त्यांनी सांगितलं आहे.

वाचा: १४ जूनसाठी राज ठाकरेंचा मनसैनिकांना महत्त्वाचा आदेशSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

hyderabad rain: ‘हैदराबादमध्ये १०० वर्षांत असा पाऊस पडला नाही’, CM नी केली ‘ही’ मोठी घोषणा – hyderabad had not experienced such heavy rainfall in...

हैदराबादः महाराष्ट्रसोबत तेलंगणमध्ये ( hyderabad rain ) पावसाने प्रचंड नुकसान झाले. महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना अद्याप राज्य सरकारकडून कुठलीही मदत घोषित करण्यात...

Nawab Malik: कोंबडा आरवला नाही तरी सकाळ होते!; फडणवीसांवर राष्ट्रवादीने डागली तोफ – ncp leader nawab malik targets devendra fadnavis

मुंबई: 'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी...

Recent Comments