Home शहरं मुंबई Aaditya Thackeray on Nisarga Cyclone: मुंबईने अनेक संकटे झेलली; निसर्ग वादळाचाही सामना...

Aaditya Thackeray on Nisarga Cyclone: मुंबईने अनेक संकटे झेलली; निसर्ग वादळाचाही सामना करू: आदित्य ठाकरे


मुंबई: मुंबईने अनेक संकटे पाहिली, या संकटाचा मुंबईने आत्मविश्वासाने सामनाही केला आहे. आता मुंबईवर निसर्ग चक्रीवादळाचं संकट घोंघावत आहे. हे संभाव्य चक्रीवादळ आले तरी आपण एकमेकांच्या सहकार्याने काम करू आणि या वादळाचाही सामना करू, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

वादळाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत पालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. चक्रीवादळापूर्वी, प्रत्यक्ष चक्रीवादळाच्या काळात आणि त्याच्या पश्चात अशा तीन टप्प्यांमध्ये विभागणी करून विविध नागरी कामे करावीत, जेणेकरुन त्यामध्ये सुसूत्रता असेल. मुंबईत पावसाळापूर्व नालेसफाई करताना काढण्यात आलेला गाळ उचलून तातडीने दूर हलविण्यात यावा. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या छाटणे, धोकादायक इमारती/भूस्खलनाची संभाव्य ठिकाणे/पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असलेले सखल भाग आदी ठिकाणी लक्ष केंद्रित करून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी न्यावे. सागरी किनारा रस्ता प्रकल्प, मेट्रो यांची कामे सध्या मुंबईत सुरू असून त्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पांवर तैनात मनुष्यबळ आणि संयंत्र यांची सुरक्षितता राखली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनासमवेत देखील परिणामकारक समन्वय साधावा. ठिकठिकाणी असलेल्या ओव्हरहेड वायर्स अथवा वीजेच्या इतरत्र असलेल्या तारा अशा ठिकाणी शॉर्ट सर्किट होवून आग लागू नये, यासाठी खबरदारी घेतली गेली पाहिजे, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी केल्या.

चक्रीवादळ: समुद्रात बोटी तैनात; अग्निशमन दल, नौदल सज्ज

तसेच, करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊन निमित्त पोलिसांनी बंदोबस्ताच्या ठिकाणी तंबू उभारून चौक्या बनवल्या असून त्याबाबत पोलिसांशी समन्वय साधून त्या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. मिठी नदी सभोवतालचा परिसर, आरे वसाहत यासह ठिकठिकाणच्या झोपडपट्टी भागांमध्ये जेथे घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, तेथे देखील योग्य उपाययोजना कराव्यात. चक्रीवादळात वाऱ्यांचा वेग लक्षात घेता रस्त्यांवर किंवा खुल्या जागांवर असणाऱ्या वस्तू, साहित्य हवेत उडून जाऊ शकते. त्यातून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व संबंधितांना असे खुले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश द्यावेत. स्थलांतरित किंवा गरजू नागरिकांना तसेच कार्यरत मनुष्यबळासाठी खाद्यपदार्थ आणि बाटलीबंद पाणी देता यावे, यासाठी संबंधित कंपन्यांशी संपर्क साधावा आणि पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. चक्रीवादळ ओसरल्यानंतर ठिकठिकाणी औषध फवारणी करणे, त्यातून डास व कीटकांचा प्रादुर्भाव रोखणे हे देखील आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोना बाधित अथवा करोना संशयित व्यक्तींना नेताना संबंधित कर्मचाऱयांना पीपीई किट उपलब्ध राहील, याची खात्री करावी. पोलीस यंत्रणेसोबत समन्वय राखून समुद्रकिनारी अथवा कुठेही नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द: छगन भुजबळ

निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकणार; NDRF च्या तुकड्या तैनातSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus in Malegaon: गाफील राहू नका – nashik collector suraj mandhare has appealed follow rules and regulations to malegaon people over coronavirus

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. त्यातून मालेगाव बाहेर पडले असले, तरी दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मालेगावातील आरोग्य...

micromax in 1b first flash sale: Micromax In 1b चा पहिला सेल आज, ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा फोन – micromax in 1b...

नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने जोरदार पुनरागमन केले आहे. नवीन इन सीरीज कंपनीने लाँच केली आहे. या सीरीजमध्ये In Note 1 आणि...

Recent Comments