Home शहरं मुंबई Aaditya Thackeray visits City Centre Mall: सिटी सेंटर मॉल आग: आदित्य ठाकरेंनी...

Aaditya Thackeray visits City Centre Mall: सिटी सेंटर मॉल आग: आदित्य ठाकरेंनी केले अग्निशमन जवानांच्या प्रयत्नांचे कौतुक – city centre mall fire: environment minister aaditya thackeray visits the location


मुंबई: दक्षिण मुंबईतील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेली आग अजूनही धुमसत असून आगीत मोबाइलच्या सुट्या भागांचा सर्वात मोठा बाजार भस्मसात झाला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री घटनास्थळाला भेट देऊन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन जवानांनी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.

घटनास्थळाला दिलेल्या भेटीचे फोटो आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. ‘सिटी सेंटर मॉलमधील आगीच्या घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोच्या मदतीनं आग नियंत्रणात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले,’ असं आदित्य यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई सेंट्रल बेस्ट बस डेपोसमोरील ‘सिटी सेंटर मॉल’मध्ये गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली. मोबाइलचे सुटे भाग तसेच इतर ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या संकटामुळे मॉलला लागून असलेल्या ऑर्किड एनक्लेव्ह या ५५ मजली टॉवरमधील सुमारे साडेतीन हजार रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. काल रात्रीपर्यंत ही आग धुमसतच होती. अग्निशमन दलाने गुरुवारी रात्रीपासून फायर इंजिनसह ५० हून अधिक वाहनांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यात काही जवान जखमी झाले आहेत. अहोरात्र मेहनत घेऊनही शुक्रवारी रात्रीपर्यंत ही आग धुमसतच होती. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा:

वाचा: ‘हा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून कसा सुटला?’

वाचा: हल्ली प्रसारमाध्यमे तटस्थ दिसत नाहीत; हायकोर्टाचे गंभीर निरीक्षणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरीच मतदानाची सोय – senior citizens, disabled people can vote at home

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना 'मोबाइल पोलिंग बुथ'च्या माध्यमातून त्यांच्या घरीच गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा...

sourav ganguly: India vs Australia : रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळायला हवी, सौरव गांगुली म्हणाले – rishabh pant and wridhiman...

सिडनी, india tour of australia 2020 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासन सुरुवात होणार आहे. पण भारताच्या संभाव्य संघात रिषभ पंत...

adult woman free to live with anyone anywhere: ‘प्रौढ तरुणी आपल्या मर्जीने कुठेही आणि कोणाबरोबरही राहण्यास स्वतंत्र’ – adult woman free to live with...

नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाने ( delhi high court ) बुधवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रौढ महिला आपल्या मर्जीने कोणाबरोबरही आणि कुठेही राहण्यास...

Recent Comments