भारतात सर्वाधिक डाउनलोड केल्या गेलेल्या हेल्थ अॅप्सच्या यादीत आरोग्य सेतू अॅप्सचा समावेश होतो. सरकारने हे अॅप अँड्राइड युजर्ससाठी ओपन सोर्स केले होते. यानंतर १२ कोटींहून अधिक नागरिकांनी हे अॅप डाउनलोड केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पीएमओच्या ट्विटमधून याचा उल्लेख केला आहे. तुम्ही आरोग्य सेतू अॅपबद्दल ऐकलं असेल याची मला खात्री आहे. आरोग्यबाबत सजग असलेल्या १२ कोटीहून अधिक नागरिकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. याने करोनाविरोधी लढाई मोठी मदत मिळाली आहे, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
अॅप बंदीवरून चीन खवळला; भारताला दिली आर्थिक युद्धाची धमकी
करोनावर लस कधी तयार होणार? PM मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैठक
कसे काम करते आरोग्य सेतू अॅप?
करोनाची बाधा होऊ नये यासाठी हे अॅप डेव्हलप केले गेले आहे. स्मार्टफोनचे लोकेशन आणि ब्ल्यू टूथच्या उपयोगाने युजर्सला हे अॅप माहिती देतं. युजर करोनाच्या संसर्गाच्या ठिकाणी आहे की नाही? हे अॅपमधून सांगण्यात येतं. आरोग्य सेतू अॅप हिंदी आणि इंग्रजीसह ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे. १० किलोमीटरच्या परिघामधील माहिती हे अॅप देऊ शकतं. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर आपला मोबाइल नंबर त्यात रजिस्टर करणं गरजेचं आहे. आपल्या जवळपास कुठे आणि किती जण करोनाने बाधित आहेत, हे या अॅपद्वारे आपल्याला समजतं.