Home मनोरंजन abhay deol on zindagi na milegi dobara: मलाही डावललं होतं; अभय देओलने...

abhay deol on zindagi na milegi dobara: मलाही डावललं होतं; अभय देओलने व्यक्त केली खदखद – abhay deol reveals award shows demoted him from zindagi na milegi dobara lead to supporting actor


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक कलाकार त्यांचे अनुभव सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. अभिनेता अभय देवल यानं देखील तब्बल नऊ वर्षानंतर त्याच्या मनातली खंत सोशल मीडियावर व्यक्त केली.आता अभिनेता अभय देओलने देखील त्याचा राग व्यक्त केला आहे. त्याने जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाच्या वेळी घडलेल्या गोष्टी सांगितल्या आहे.

अभयने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाच्यासंदर्भात घडलेल्या गोष्टी शेअर केल्यात. त्याच्या पोस्टमध्ये त्यानं बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळ्यांवरही निशाणा साधला आहे. २०११मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपट ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण केवळ हृतिकला प्रमुख भूमिकेसाठी पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकनं देण्यात आली होती. फरहान आणि अभय यांना सहाय्यक भूमिकेसाठी नामांकनं देण्यात आलं होतं. याचा राग अभयनं त्याच्या पोस्टमध्ये व्यक्त केलाय.

सुशांतच्या आत्महत्येचा धक्का; आठवड्याभरात चौघांनी मृत्यूला कवटाळले
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ २०११मध्येहा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या रोजच याचा जप करनं गरजेचं वाटतंय.या कठिण काळात पाहाता येईल असा चित्रपट. मला सांगावसं वाटतं की, त्यावेळी त्यावेळी प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात मला आणि फरहानला मुख्य अभिनेत्याच्या नामांकनांमधून वगळण्यात आलं होतं. पण हृतिक आणि कतरिना यांना मुख्य भूमिकेसाठी नामांकनं देण्यात आली होती. सिनेसृष्टीच्या लॉजिकनुसार हा चित्रपट एका प्रेमात पडलेल्या व्यक्तीचा चित्रपट आहे, त्याला त्याचे मित्र साथ देतात. इंडस्ट्रीमधल्या अशा अनेक लॉबी आहेत ज्या तुमच्यापाठीमागे तुमच्या विरोधात काम करत असतात. त्यानंतर मी सर्वच पुरस्कार सोहळ्यांवर बहिष्कार घातला. पण फरहानला काही फरक पडला नाही. असं म्हणत त्यानं त्याचा राग व्यक्त केलाय. तसंच पोस्टच्या शेवटी अभिनेत्री कल्की हिनं केलेल्या अभिनयाचंही कौतुक करायला तो विसरला नाही.

सुशांतच्या चाहत्यांकडून सलमानच्या बिईंग ह्युमन स्टोअरची तोडफोड
दरम्यान, गायक सोनू निगम यानं सिनेसंगीत क्षेत्रातही हेच सुरू असल्याकडे लक्ष वेधलं आहे.सोनू यानं याबाबत सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘बॉलिवूडमध्ये म्युझिक माफीया आहेत. संगीत क्षेत्रात असलेले काही लोक, नव्यानं यात येऊ पाहणाऱ्या गुणवान मंडळींना आणि बाहेरच्या लोकांना काम मिळू देत नाहीत. तसंच काही मोठ्या अभिनेत्यांनी खोडा घातल्यामुळे संगीतकार आणि गायकांकडून काम काढून घेण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत’, असं तो म्हणतो.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health minster rajesh tope: चाचण्यांसाठी पुन्हा दरकपात – maharashtra goverment again reduced price of corona test

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्यात करोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली...

Lasalgaon onion market: मुंबई बाजारात कांद्याची आवक घटली – onion imports declined in mumbai due to onion auction close in lasalgaon onion market

म. टा. वृत्तसेव, नवी मुंबईकांद्याची मर्यादेपेक्षा अधिक साठवणूक करणाऱ्या साठेबाजांवर धाडी पडण्यास सुरुवात झाल्यानंतर, कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये लिलाव बंद पडले आहेत....

Recent Comments