Home आपलं जग करियर abroad study : परदेशी शिक्षण ‘लॉकडाऊन’ - coronavirus lockdown effect of abroad...

abroad study : परदेशी शिक्षण ‘लॉकडाऊन’ – coronavirus lockdown effect of abroad study


> अजय उभारे, विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

परदेशात उच्च शिक्षण घेता यावं म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी काही परदेशी विद्यापीठांत फॉर्म भरले होते. काहींनी प्रवेश परीक्षा दिल्या होत्या. शेवटच्या वर्षातील परीक्षेनंतर मिळणाऱ्या नोकऱ्यांवरही अनेकांनी पाणी सोडलं. पण, करोनाच्या उत्पातामुळे बहुतांश परदेशी विद्यापीठांतील प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे.

कित्येक परदेशी विद्यापीठांचं अर्ज शुल्कच पाच ते सहा हजार रुपयांहून अधिक असतं. काही विद्यार्थ्यांनी ते भरुन आवश्यक त्या प्रवेश परीक्षाही दिल्या. त्यांचे निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. बहुतांश परदेशी विद्यापीठं आणि शिक्षण संस्थांचे वर्ग ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होत असल्यामुळे एप्रिल ते जुलै दरम्यानच्या काळात त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते. पण, आता करोनामुळे सगळी प्रक्रियाच कोलमडली आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षात मिळणारी प्लेसमेंट नाही आणि आता परदेशी शिकण्याचं स्वप्नही करोनामुळे अपूर्ण राहणार का? अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावते आहे.

एखाद्या परदेशी विद्यापीठ अथवा कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी मोठी रक्कम भरावी लागते. दुसऱ्या एखाद्या चांगल्या विद्यापीठात संधी मिळाली, की त्या पैशांवर पाणी सोडत दुसरीकडे प्रवेश घेता येते. परंतु आता काही विद्यापीठांकडून अद्याप कुठल्याही सूचना मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना काय करावं ते समजेनासं झालं आहे.

“सध्याच्या परिस्थितीमुळे परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरचं नुकसान झालं आहे. परदेशी शिक्षण घेता येईल म्हणून काहींनी इथल्या नोकरीचे पर्याय नाकारले. आता या परिस्थितीमुळे शिक्षणाची संधीही हुकणार असल्याची चिन्हं आहेत. परदेशातली विद्यापीठं आता खूप कमी विद्यार्थ्यांना संधी देतात. तिथली प्रवेश प्रक्रियेची फीसुद्धा लाखोंच्या घरात असते. त्यामुळे प्रवेश मिळाला नाही, तर फीचे पैसे पाण्यात जातील. ऑगस्टमध्ये वर्ग सुरू होतात. त्यामुळे आताच्या इनटेकमध्ये प्रवेश मिळणं कठीण आहे. खूप कमी विद्यार्थ्यांना जानेवारी इनटेकमध्ये प्रवेश मिळू शकतो. या सगळ्याचा विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतो. आताची परिस्थिती नियंत्रणाबाहेरची असल्यानं विद्यार्थ्यांनी त्याबाबत अधिक विचार करू नये.”-सुचित्रा सुर्वे, करिअर मार्गदर्शक

परदेशी विद्यापीठात प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना साधारणतः एप्रिल ते मे महिन्यादरम्यान कन्फर्मेशन देणं बंधनकारक असतं. शिवाय, परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर तेथील जागा निश्चित करण्यासाठी दिली जाणारी फी हजारों घरात असते. ती परत मिळणार नसल्यामुळे आणि यावर्षी त्या विद्यापीठांमध्ये जाता येईल किंवा नाही याबद्दल शंका असल्यामुळे भविष्यातील इंटर्नशिप, नोकरी अशी अनेक गणितं कोलमडणार असल्याचं चित्र आहे. शिवाय, अनेक विद्यापीठांकडून नीट माहिती मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या संभ्रम आहे.


तज्ज्ञ काय म्हणतात?

० सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याच विद्यापीठ किंवा कॉलेजांकडे कुठलाही वेगळा पर्याय उपलब्ध नसल्यानं सर्वांसाठीच ही चिंतेची बाब आहे.

० एखाद्या परदेशी कॉलेजमध्ये प्रवेशाच्या दृष्टीनं काही संकेत मिळाले असतील तर या सगळ्याचा लेखी स्वरूपात उल्लेख असलेले मेल किंवा पत्रक याकडे विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्यावं.

० संभाषणासाठी कोणत्याही फोनकॉलपेक्षा कॉलेजच्या किंवा विद्यापीठाच्या अधिकृत इमेल आयडीचा वापर करावा. प्रवेश निश्चित झाल्यास भरलेल्या फी बाबतचे तपशील आणि फी भरल्याची पावती मिळवून ती जपून ठेवा.

० प्रवेश निश्चितीनंतरही तुम्हाला करोनामुळे तिकडे जाता आलं नाही, तरी तुम्ही पूर्वी भरलेल्या फीपेक्षा अधिक फी आकारली जाणार नाही याची खात्री करून त्याबाबत संबंधित विद्यापीठ अथवा कॉलेजकडून लेखी स्वरुपात हमी घेणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

० सध्या ऑनलाइन कोर्सेस आणि ऑनलाइन प्रोजेक्ट्स याखेरीज दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसू शकेल.

० वर्ष वाया जाण्याची चिंता न व्यक्त करता विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करत स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे.

दहावीच्या मुलांसाठी अभ्यासाची ‘दशपदी’

नोकरीच्या नावे फसवणूक ‘अशी’ ओळखा

बँकॉकमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परतीची ओढ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

Recent Comments