Home मनोरंजन abu salem and sonu nigam: सोनू निगमचे अबू सालेमशी संबंध होतेच; दिव्या...

abu salem and sonu nigam: सोनू निगमचे अबू सालेमशी संबंध होतेच; दिव्या खोसला कुमारचा पलटवार – divya khosla kumar claims sonu nigam had links with abu salem video viral


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि कंपूशाहीच्या मुद्द्यावरुन घमासान सुरू असतानाच, गायक सोनू निगम यानंही यावरुन नाराजीचा नवा सूर आळवला आहे. सिनेसंगीत क्षेत्रातल्या गटबाजीवर प्रकाश टाकत, ‘इथे म्युझिक माफियांचं राज्य सुरू आहे’ असं विधान करत त्यानं एकच खळबळ उडवून दिलीय.

सोनू निगमनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्यानं टी- सीरिजचे मालक भूषण कुमार याच्यावर संगीत उद्योग क्षेत्रातील माफिया असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच सोनूने त्याच्यासोबत पंगा न घेण्याचा सल्लाही दिला. या सगळ्यात भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमारची प्रतिक्रिया समोर आली होती. दिव्यानं तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर सोनूबद्दल अनेक गोष्टी लिहीत त्याला कृतघ्न असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये सोशल मीडियाच्या द्वारे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
सोनू निगमच्या समर्थनात धावून आला अदनान सामी
अभिनय क्षेत्रात नवोदित कलाकारांना चटकन न मिळणारी संधी, बड्या कलाकारांचे स्टारपुत्र, स्टारकन्या यांचे होणारे लाड यावरुन वाद सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सिनेसंगीत क्षेत्रातही काही वेगळी परिस्थिती नसल्याचं सांगत गायक सोनू निगमनं म्हटलं होतं. भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमार हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत सोनूच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. ‘टी-सीरीज’मध्ये ९७ टक्के लोकं ही आउटसाइडर्स म्हणजेच सिनेसृष्टी किंवा संगीतक्षेत्राच्या बाहेरची आहेत. याच कंपनीनं अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळवून दिली आहे. असं म्हणत तुम्ही किती बाहेरून आलेल्या कलाकारांना संधी दिल्यात? असा सवालही तिनं सोनू निगम याला विचारला आहे.

सोनू निगमवर भडकली भूषण कुमारची पत्नी, म्हणाली
दिव्यानं या व्हिडिओमध्ये सोनू निगमला त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आहे. गुलशन कुमार यांच्यामुळं सोनू निगमचं करिअर सुरू झालं होतं. सोनू दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर गुलशन कुमार यांनी त्याला संधी दिली होती. त्यामुळं आज तो इथपर्यंत पोहचेला आहे. असं दिव्या म्हणाली. ‘टी-सीरीज’ जेव्हा अडचणीत होती तेव्हा सोनूनं दुसऱ्या कंपनीसाठी काम सुरू केलं.असंही दिव्या म्हणाली.

सोनू निगमचे अबू सालेमसोबत संबंध
सोनू निगनचे अबू सालेमसोबत संबंध होते, असं ही दिव्यानं तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. भूषण कुमार यांनी अबू सालेमपासून वाचण्यासाठी सोनू निगमची मदत मागितल्याचं सोनूनं म्हटलं होतं. यावरून सोनू निगमचे अबू सालेमसोबत संबंध होते, हे सिद्ध होतं, याकडं सर्वांनी लक्ष द्या, असंही दिव्या म्हणते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

'सुपर संभाजीनगर'च्या परवानगीची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरात '' चे डिस्प्ले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे का याची चौकशी केली जाईल,...

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

प्रियांका चोप्रा: पलटवार असावा तर असा! लोकांनी उडवली ड्रेसची थट्टा, पाहा प्रियांका चोप्राचं उत्तर – priyanka chopra tweet her viral memes on her dress...

हायलाइट्स:प्रियांका चोप्रा आणि फॅशन याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रियांकाच्या ड्रेसवर व्हायरल होत आहेत मीम्सस्वतः प्रियांकानेही घेतला या मीम्सचा आनंदमुंबई- प्रियांका चोप्राचा हात फॅशन...

kapil sibal congress leader: ‘उत्तर-दक्षिण’ वक्तव्यावरून राहुल गांधी वादात; कपिल सिब्बलांनी दिला सल्ला, म्हणाले… – congress leader kapil sibal speaks on rahul gandhis statement...

नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी उत्तर व दक्षिण भारतातील राजकारणावर केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांना आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ...

Recent Comments