Home ताज्या बातम्या after petrol desial lpg-gas-cylinder price increase 1st-july-2020 mhkk | National

after petrol desial lpg-gas-cylinder price increase 1st-july-2020 mhkk | National


छोटासा दिलासा म्हणजे 19 किलो सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

मुंबई, 01 जुलै: एकीकडे कोरोनचं थैमान सुरू आहे तर त्यामध्ये इंधनाचे दर गगनला भिडत आहे. मंगळवार आणि बुधवारी पेट्रोल डिझेलचे दर स्थिर राहिल्यानं काहीसा दिलासा मिळाला असं वाटत असतानाच बुधवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. आधीच इंधनामुळे खिसा रिकामा होत असताना आता गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणींचं बजेटही कोलमडलं आहे.

जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) एलपीजी गॅस सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर) च्या अनुदानाशिवाय किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 14.2 किलो विना अनुदानित LPG सिलिंडरची किंमत दिल्लीत 1 रुपये प्रति सिलिंडर महाग झाली आहे. आता नवीन दर 594 रुपयांवर पोहोचले आहेत. अन्य शहरांमध्येही आजपासून घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

कोलकातामध्ये 4 रुपये, मुंबईत 3.50 आणि चेन्नईत 4 रुपये महाग झाला आहे. मात्र, दिलासा म्हणजे 19 किलो सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. यापूर्वी, दिल्लीत जून महिन्यात दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति सिलेंडर 11.50 रुपये महाग झाली होती. त्याच वेळी मेमध्ये ते 162.50 रुपयांनी स्वस्त झाले.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jul 1, 2020 08:29 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

Recent Comments