Home देश Ahmed Patel: ईडीकडून चौकशी; अहमद पटेल म्हणाले, 'मोदी आणि शहांचे पाहुणे घरी...

Ahmed Patel: ईडीकडून चौकशी; अहमद पटेल म्हणाले, ‘मोदी आणि शहांचे पाहुणे घरी आले होते’ – modi ji aur amit shah ji ke mehmaan aaye the says ahmed patel


नवी दिल्लीः अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) एका पथकाने संदेसरा घोटाळा प्रकरणी शनिवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची चौकशी केली. पटेल यांच्या घरी जाऊन ही चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर अहमद पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. मोदी आणि अमित शहांचे पाहुणे आज घरी आले होते. त्यांनी प्रश्न विचारली आणि आपण त्यांना उत्तरं दिली. यानंतर ते निघून गेले, असं अहमद पटेल यांनी सांगितलं. तीन सदस्यांची एक टीम २३ मदर टेरेसा क्रिसेंट स्थित अहमद पटेल यांच्या घरी चौकशीसाठी गेली होती, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ईडीने यापूर्वी दोन वेळा पटेल यांना चौकशीसाठी बोलावले होते. पण ज्येष्ठ नागरिक असल्याने करोनामुळे चौकशीसाठी ते येऊ शकले नाहीत. यानंतर ईडीने आपली एक टीम चौकशीसाठी त्यांच्या घरी पाठवली. यादरम्यान पटेल यांची किमान साडेआठ तास चौकशी चालली.

चीनने राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का दिले? सोनिया गांधींना भाजपचा थेट सवाल

बेरोजगारी आणि चीनला सोडून विरोधकांशी लढाई

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बेरोजगारी बोकाळत आहे. दुसरीकडे चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला आहे. त्यांना सोडून सरकार विरोधकांशी लढाई करत आहे. कायद्याला कायद्याचं काम करू द्यावं. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगडफेक करू नये, असं अहमद पटेल म्हणाले.

पूर्व लडाखमध्ये चीन सीमेवर भारताने उभारली एअर डिफेन्स सिस्टिम

संदेसरा बंधुनी कोट्यावधी बुडवले

नीरव मोदीच्या तुलनेत अनेक पटींनी संदेसरा बंधुंनी भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावला आहे. ईडीने हा दावा केला आहे. स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड (एसबीएल) अथवा संदेसरा ग्रुप आणि त्याच्या मुख्य प्रवर्तकांनी, नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती संदेसरा यांनी भारतीय बँकांचे जवळपास १४, ५०० कोटी रुपये बुजवल्याचा आरोप आहे. तर नीरव मोदीने बँकांची ११, ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gautam Pashankar: पुण्यातून बेपत्ता झालेले प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर अखेर ‘इथे’ सापडले – pune police crime branch successfully traced businessman gautam pashankar in jaipur...

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे अखेर महिनाभरानंतर सापडले. त्यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश...

french company thales in india: राफेलचे भाग भारतातच ‘या’ राज्यात होणार तयार! – rafale parts to be built in up french company thales opens...

लखनऊ : भारतीय वायुदलात समावेश करण्यात आलेल्या राफेल या लढाऊ विमानाचे सुटे भाग उत्तर प्रदेशात तयार होणार आहेत. यासाठी राफेलचे भाग बनवणारी फ्रान्सची...

nashik corona update: करोनावाढीचा धोका २६ जानेवारीपर्यंत अधिक – nashik corona update : corona cases will increase till 26 January

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकदिवाळीनंतर नाशिकमध्ये काही दिवसांपासून रुग्णवाढीचा चढता क्रम पाहायला मिळत आहे. एक डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत अधिक रुग्णवाढ...

Recent Comments