Home शहरं अहमदनगर Ahmednagar: तोतया 'PMO' अधिकाऱ्याचे कारनामे उघड; निघाला बलात्कारातील आरोपी - ahmednagar accused...

Ahmednagar: तोतया ‘PMO’ अधिकाऱ्याचे कारनामे उघड; निघाला बलात्कारातील आरोपी – ahmednagar accused in rape case who misleading as a pmo officer


अहमदनगर: पंतप्रधान कार्यालयातील (PMO) अधिकारी असल्याची बतावणी करून कर्जतमध्ये पोलिसांचा शाही पाहुणचार झोडणाऱ्या ‘तोतया’चे आणखी काही कारनामे उघड होत आहेत. त्याच्याविरूद्ध मध्य प्रदेशात एका युवतीला फसवून तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तोतयेगिरी केल्याच्या प्रकरणात सध्या तो अटकेत असून, त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कर्जत तालुक्यातील राशीन येथील योगेंद्र उपेंद्र सांगळे याने आपण पीएमओमध्ये विशेष अधिकारी असल्याचे भासवत पोलिसांचा शाही पाहुणाचार झोडला. प्रत्यक्षात तो कोठेही अधिकारी नाही, हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलीस त्याची कसून चौकशी करत असून, त्यातून एकेक कारनामा उघड होत आहे.

कर्जतला येण्याआधी त्याने मध्य प्रदेशातही अशीच तोतयेगिरी केल्याचे उघड झाले आहे. सांगळे याने २०१८ मध्ये फेसबुकवरून मध्य प्रदेशमधील एका युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. प्रेमाचे खोटे नाटक करून त्या मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यासाठी तो मध्य प्रदेशात गेला. तेथे तिच्यासोबत हॉटेलमध्ये, लॉजवर राहिला. तिला अनेक ठिकाणी फिरायला घेऊन गेला. एका मंदिरात दर्शनासाठी रांग सोडून प्रवेश मिळविण्यासाठी त्याने आपण व्हीआयपी असल्याची बतावणी केली. मात्र, तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडविले. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मित्र असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पिच्छा सोडला नाही. वरिष्ठांकडे चौकशी केल्यावर त्याचे पितळ उघड पडले. त्याला तेथील पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हा प्रकार सुरू असताना ती युवतीही सोबत होती. तिच्यासमोरच ही सर्व माहिती उघड झाल्यावर आपलीही फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. मग तिनेही फसवणूक आणि बलात्कार केल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

तेथून जामिनावर सुटल्यावर तो राशीनला आला. इकडे आल्यावर पु्न्हा तोतयेगिरी सुरू केली. केवळ पोलिसच नव्हे तर अन्य सरकारी विभागांनाही त्याने फसविल्याचे पोलिसांच्या चौकशीत आता पुढे येत आहे. राशीनमधील त्याच्या घरी कमी दाबाने वीज पुरवठा होत होता. त्यामुळे त्याने वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पीएमओचे नाव सांगून नवी वीजवाहिनी बसवून घेतली. आधीच पोलिसांचा विश्वास संपादन केलेल्या या तोतयाने इतर ठिकाणी पोलिसांचा वापर करून सवलती मिळविल्या आहेत. कर्जतच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्याची नेहमी उठबस होत असे. तेथील पोलीस आणि कर्मचाऱ्यांनाही तो आदेश देऊ लागला होता. अधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनातून तो फिरत असे. कर्जत पोलीस ठाण्यात दाखल तोतयेगिरीच्या गुन्ह्यात सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीपीई किट घालून चोरट्यांनी दुकानं फोडली; CCTVत कैद

कार विहिरीत कोसळली; पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीसह २ मुलांचा मृत्यूSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Corona Update: coronavirus – तीन मृत्यू, ८४ नवे बाधित – aurangabad reported 84 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण करोना बळींची संख्या १०५८ झाली आहे. त्याचवेळी सोमवारी (२६ ऑक्टोबर) जिल्ह्यात ८४ नवे...

Mumbai High Alert Get Input Of Terrorist Attack – मुंबईत हायअलर्ट; दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने माहिती...

Sambhaji Raje Slams Maha Vikas Aghadi Government Over Maratha Reservation – का खेळखंडोबा करता?; मराठा आरक्षणावरून संभाजीराजेंचा सरकारला सवाल

मुंबई: 'मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार समन्वयानं काहीही करताना दिसत नाही. मी अनेकदा सरकारला सूचना केल्यात. अशोक चव्हाण यांच्याशी बोलणं झालं आहे. पण...

Recent Comments