Home शहरं अहमदनगर Ahmednagar: Contenment zones in ahmednagar: अहमदनगरमध्ये कंटेन्मेंट झोन वाढतायत, शहरात पुन्हा लॉकडाऊन...

Ahmednagar: Contenment zones in ahmednagar: अहमदनगरमध्ये कंटेन्मेंट झोन वाढतायत, शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार? – five contenment zones in ahmednagar


म.टा.प्रतिनिधी, नगरः नगरमध्ये मागील आठवड्यापासून रुग्ण वाढीचा वेग वाढल्यामुळे कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढू लागली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा देण्याची जबाबदारी त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. त्यामुळे कंटेन्मेंट झोन अजून वाढल्यास तेथे अत्यावश्यक सेवा देताना मनुष्यबळाची कमतरता भासण्याचा धोका असल्याने महापालिकेसह जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे संपूर्ण नगरच लॉकडाऊन करण्याचा पर्याय समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या तातडीची बैठक यावर चर्चाही झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव नगर शहरामध्ये वाढू लागल्याने आज दुपारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिका, पोलीस प्रशासन या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये नगरमध्ये वेगाने होणारा करोना फैलाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास वेळप्रसंगी स्थानिक पातळीवर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिका नोडल अधिकारी डॉ.सतिष राजूरकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे डॉ. विरेंद्र बडदे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वाचाः ‘लॉक’ की ‘अनलॉक’ नागरिकांमध्ये चर्चेला उधाणकरोनाचे नगरमध्ये रुग्ण वाढत असल्यामुळे नगर लॉकडाऊन होणार की काही भागात व्यवहार सुरू राहणार, याबाबत आता नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. सावेडीत देखील एक कंटेन्मेंट झोन झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नगरमध्ये करोनाचा रुग्ण वाढल्यानंतर तो नेमका कोणत्या भागातील आहे, कुठून आला, त्याभागात आता किती रुग्ण झाले, याची माहिती घेऊन त्यावरून तेथे कंटेन्मेंट झोन होणार का, याचेही अंदाज बांधले जात आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: करोनाचे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू – aurangabad reported 34 new corona cases and 1 death in yesterday

औरंगाबाद: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोनाबाधितांची वाढ झाली. त्यात शहरी विभागात ३२, तर ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील...

Mamata Banerjee: ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या… – wb cm mamata banerjee anguish after jai shree ram slogans were raised

कोलकाताः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या...

Recent Comments