Home शहरं अहमदनगर ahmednagar murder: तरुणाच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकले; अकोल्यात खळबळ - ahmednagar...

ahmednagar murder: तरुणाच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकले; अकोल्यात खळबळ – ahmednagar murder unidentified young man dead body pieces found in river in akole


अहमदनगर: तरुणाचा हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे गोण्यांमध्ये भरून नदीपात्रात फेकल्याची खळबळजनक घटना अकोले तालुक्यात उघडकीस आली आहे. वाकी शिवारात कृष्णावंती नदीच्या पात्रात गोण्या आढळून आल्या. पाच ते सहा दिवसांपूर्वीच या तरुणाची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत तरुणाची ओळख पटवण्यात येत आहे.

अकोले तालुक्यातील वाकी शिवारात एका अनोळखी तरुणाचा अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाच्या हत्येनंतर मृतदेहाचे ९ तुकडे करून ते दोन गोण्यांमध्ये भरले आणि त्या कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून दिल्या. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. गोणीत भरलेल्या मृतदेहाचे तुकडे हे अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील तरुणाचे असावेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

भयानकच! ४ वर्षीय मुलाला बादलीत बुडवून मारलं; शेजारी महिलेचे अमानुष कृत्य

वर्ध्यात खळबळ; पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर लष्कराच्या जवानाची आत्महत्या

वाकी शिवारातून वाहत असलेल्या कृष्णावंती नदीवर असणाऱ्या पुलाच्या खाली दोन गोण्या आढळून आल्या. त्यातून दुर्गंधी येत असल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती राजूर पोलीस ठाण्यात कळवली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पुलाखाली दोन गोण्यांमध्ये काहीतरी भरल्याचे त्यांना दिसले. त्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्या गोण्या उघडून पाहिल्यानंतर शरीराचे तुकडे असल्याचे दिसले. २० ते २५ वयोगटातील तरुणाच्या शरीराचे तुकडे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पाच ते सहा दिवसांपूर्वीच या गोण्या याठिकाणी फेकल्या असाव्यात असा कयास आहे. याबाबत राजूर पोलिसांशी संपर्क केला असता, ‘नदीवरील पुलाखाली सापडलेल्या गोण्यांमध्ये साधारणपणे वीस ते २५ वर्षांच्या तरुणाच्या शरीराचे नऊ तुकडे करून टाकल्याचे आढळले आहे. ते साधारणत: पाच ते सहा दिवसांपूर्वी संबंधित ठिकाणी फेकण्यात आले असावेत, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

महिलेसमोर अश्लील चाळे करणारा इन्स्पेक्टर फरार, २५ हजार ‘इनाम’

हनी ट्रॅपमध्ये अडकवले; खंडणी वसुली करणारी टोळी जाळ्यात

गावठी कट्टा, जिवंत काडतुसे सापडली, दोघांना अटक

अहमदनगरमध्ये गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gujarat: Gujarat: २२ वर्षीय तरुणी वॉकसाठी बाहेर पडली, दुचाकीस्वार आला अन् – 22 year old girl molested by unknown man while evening walk in...

अहमदाबाद: २२ वर्षीय तरुणी इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडली असताना, दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत...

नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

म. टा. वृत्तसेवा, पनवेल पनवेलमधील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक यांनी प्रभागातील बेकायदा बांधकामाची तक्रार पनवेल महापालिकेत केली म्हणून त्यांना जिवे ठार मारण्याची ...

heavy rain in nashik: सात हजार हेक्टरला फटका – heavy rain hits to rice , tomato, grape’s, vegetable crop in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकपरतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील भात, टोमॅटो, मक्यासह द्राक्ष, भाजीपाला आणि काढणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या...

Recent Comments