Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: अडचणीतील व्यावसायिकांना मदत - helping troubled professionals

ahmednagar news News: अडचणीतील व्यावसायिकांना मदत – helping troubled professionals


मल्टीस्टेट संस्थांच्या ‘व्हिसी’मध्ये निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नगर

जुने आर्थिक वर्ष संपून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात ‘लॉकडाउन’मध्ये झाली असल्याने अनेक आर्थिक संस्थांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीतही छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आधार देण्याचा निर्णय मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनने घेतला आहे. ‘करोना’चे सावट संपल्यावर छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करून त्यांना पुन्हे उभे करण्यासाठी आवश्यक प्रयत्नांची गरजही फेडरेशनद्वारे व्यक्त केली गेली.

राज्यात ‘लॉकडाउन’ असल्याने मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनच्या संचालकांची नव्या आर्थिक वर्षाची पहिली बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. फेडरेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या पुढाकारातून झालेल्या या ‘व्हिसी मीटिंग’मध्ये संचालकांनी घरूनच सहभाग घेतला. या वेळी संचालक कडूभाऊ काळे, शिवाजी कपाळे, आजिनाथ हजारे, जयसिंग पंडित, अंकलपोटे पाटील, जितेंद्र जैन, रवींद्र कानडे, डॉ. सुकेश झंवर, प्रवीण प्रजापती, मगराज राठी, व्यंकटराव गुंड, विठ्ठल वाडगे आदींसह धनंजय तांबेकर, आदिनाथ शिंदे, चंद्रकांत शेजुळ यांनी सहभागी होऊन मल्टीस्टेट पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीचे सूत्रसंचालन सुरेखा लवांडे यांनी पुण्याहून केले. अनिल वर्पे यांनी तांत्रिक सहकार्य केले. बुलडाणा अर्बन मल्टीस्टेटचे व्यवस्थापक डॉ. सुकेश झंवर यांच्यासह वाबळे व काळे यांनी यात संचालकांच्या तसेच मल्टीस्टेट संस्थांसमोरील अडचणींबाबतच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

विविध उपाययोजना करणार

करोना ‘लॉकडाउन’ संपून सर्व दैनंदिन व्यवहार सुरू झाल्यावर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांबरोबरच बचत गटांनाही आर्थिक सहकार्य करण्याचा तसेच नागरिकांसाठी सोने तारण कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला. मल्टीस्टेट पतसंस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी मल्टीस्टेट फेडरेशन प्रयत्न करणार असून, ‘लॉकडाउन’ संपल्यानंतर उद्भवणारे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचेही या वेळी ठरवण्यात आले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

'चांदीचे बंगले'.. जगण्याचा संघर्ष

मणिबेली, (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) : नर्मदा बचाव आंदोलनामुळे आणि सोशल मीडियामधून नर्मदेकाठचे हे गाव अनेकांपर्यंत पोहचले आहे. या मणिबेलीला निवडणुकांच्या निमित्ताने...

Aurangabad Corona Update: Coronavirus : दोन मृत्यू, २५६ नवे बाधित – aurangabad reported 256 new corona cases and 2 deaths yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहरात रविवारी करोनाच्या २५६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दोन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.तिसगाव येथील ६६ वर्षीय, तर संभाजी कॉलनी,...

Subodh Bhave Post For Gayatri Datar On Instagram See Funny Comment – ‘सेटवर कसा असतो गायत्री सोबतचा सीन’ सुबोध भावेच्या गंमतीशीर पोस्टवर कमेंटचा पाऊस...

हायलाइट्स:गायत्री दातारनं सुबोध भावेच्या 'तुला पाहते रे' या मालिकेतून केलं होतं अभिनय क्षेत्रात पदार्पणसुबोध भावेनं गायत्रीसाठी लिहिली गंमतीशीर पोस्टसुबोध भावेच्या पोस्टवर चाहत्यांच्या धम्माल...

Recent Comments