Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : अति जोखमीच्या रुग्णांवर लक्ष केंद्रीत - focus on...

ahmednagar news News : अति जोखमीच्या रुग्णांवर लक्ष केंद्रीत – focus on high-risk patients


संगमनेर व अकोल्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विविध सूचना

म. टा. प्रतिनिधी, नगर

करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर आपत्कालीन योजनेचा भाग म्हणून अती जोखीम अवस्थेतील (हाय रिस्क) रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी संगमनेर-अकोल्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

करोना प्रतिबंधासाठी लागू केलेले लॉकडाउन काहीअंशी शिथिल होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्कालीन उपाययोजनांचे नियोजन प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आले आहे.

श्वसन संस्थेचे जुने आजार, अस्थमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, वृद्ध व्यक्ती अशा अति जोखीम अवस्थेतील व्यक्तींचा करोना प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांना सामाजिक बांधिलकीतून प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी सरकारने काही सूचना दिल्या आहेत, त्या अनुषंगाने वैद्यकीय व्यावसायिकांनी काम करणे अपेक्षित असल्याचे प्रांताधिकारी मंगरुळे यांनी स्पष्ट केले आहे.

मंगरुळे यांनी संगमनेर-अकोल्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना यासंदर्भात एक पत्र दिले आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य व्यक्तीचे करोनापासून रक्षण करण्याचे काम करताना अति जोखमीच्या व्यक्तींच्या बाबतीत विशेष प्रयत्न करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन त्यांनी या पत्रात केले आहे.

काय आहेत डॉक्टरांसाठी सूचना..

-रुग्णालयाशी संलग्न असलेल्या अति जोखीम प्रवर्गातील व्यक्तीचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांकासह यादी तयार करावी.

-अति जोखीम प्रवर्गातील व्यक्तींचा करोना प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी आजाराची शास्त्रीय माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करावे.

-अशा रुग्णांचा डॉक्टरांनी त्यांच्या स्तरावर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्याद्वारे देखभाल करावी. यामध्ये संबंधित रुग्णाने दररोज घरच्याघरी शरीराचे तापमान घेऊन तापमान जास्त असल्यास डॉक्टरांशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधावा खोकला व श्वसनाचा त्रास यासारखी लक्षणे आढळल्यास लगेच कळवण्यासंदर्भात सूचना द्याव्यात.

-अति जोखीम प्रवर्गातील व्यक्तींचा बाहेर कमीतकमी संपर्क येईल, यादृष्टीने व्हाट्सअपद्वारे या व्यक्तींची रक्तशर्करा, रक्तदाब व तापमान याची माहिती घेत राहावी.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sudhir mungantiwar: ‘एकनाथ शिंदे, तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता’ – eknath shinde has the potential to be chief minister says sudhir mungantiwar

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकाही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे चर्चेत आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पुन्हा नवे वक्तव्य करून...

Chloe Zhao: आशियाचा सन्मान : क्लोई जाओ – chloe zhao is becoming the first asian woman to ever win the prize for best director

'करुणा सर्व बंधने पार करते आणि मग तुमची वेदना माझी वेदना बनते...' गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांनी याच कार्यक्रमात व्यक्त...

Recent Comments