Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : अल्पवयीन मुलाचा छळ, मनपा आरोग्याधिकारी - अग्निशमन प्रमुखासह...

ahmednagar news News : अल्पवयीन मुलाचा छळ, मनपा आरोग्याधिकारी – अग्निशमन प्रमुखासह चौघांवर गुन्हा – minor boy alleged harassment by officers


नगरः अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन त्याला मारहाण करीत त्याचा छळ केल्याप्रकरणी महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, अग्नीशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह महापालिकेतील कर्मचारी बाळू घाटविसावे व पीडित मुलाची आई यांच्याविरोधात आज तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये बाल अधिनियम २०१५ च्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलानेच फिर्याद दिली आहे.

नगरमध्ये राहणाऱ्या महापालिकेच्या हॉस्पिटलमधील एका नर्सच्या घरी १३ जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास डॉ़.अनिल बोरगे, शंकर मिसाळ व बाळू घाटविसावे यांनी दारु पिऊन आरडाओरड केली़. याबाबत पीडित मुलाने त्यांना जाब विचारला असता त्यांनी मुलास शिवीगाळ करीत मारहाण केली़. तसेच बोरगे व मिसाळ यांनी मुलास जिवे मारण्याची धमकी दिली़. त्यानंतर घाटविसावे याने मुलाचे पाय धरून त्याला उचलले, व आरोपी बोरगे आणि मिसाळ यांनी मुलास गच्चीवरून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तसेच यापूर्वी शंकर मिसाळ याने तीन महिन्यापूर्वी पीडित मुलाच्या डाव्या हाताला चटके दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, मुलाचा छळ करण्यासाठी आरोपी डॉ.अनिल बोरगे, शंकर मिसाळ व बाळू घाटविसावे यांना पीडित मुलाच्या आईने साथ दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. तसेच पीडित मुलाला त्याच्या आईने सुद्धा मारहाण केली आहे. त्यामुळे संबंधित मुलाच्या आईवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करीत आहे.

काय आहे कलम ७५

बाल अधिनियम २०१५ चे कलम ७५ हे बालकास क्रुरतेनी वागविण्यासंदर्भात असल्याची माहिती बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांनी दिली. जी कोणी व्यक्ती बालकाचा प्रत्यक्ष ताबा असताना किंवा बालक त्याच्या नियंत्रणाखाली असताना, बालकावर हल्ला करील, सोडून देईल, गैरकृत्य करील, जाणीवपूर्वकक उघड्यावर टाकील, बालकास अनावश्यक शारीरिक किंवा मानसिक कष्ट होतील, अशाप्रकारे दुर्लक्ष करील, त्या व्यक्तीस तीन वर्षापर्यंत कैद किंवा रुपये एक लाख पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे कलम ७५ मध्ये म्हंटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

Recent Comments