Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: आठ जणांची 'करोना'वर मात - eight men beat 'corona'

ahmednagar news News: आठ जणांची ‘करोना’वर मात – eight men beat ‘corona’


म. टा. प्रतिनिधी, नगर जिल्ह्यातील ‘करोना’बाधित असलेल्या आणखी आठ जणांनी या आजारावर मात केली आहे. यामध्ये जामखेड येथील चार, संगमनेर येथील तीन व आश्वी ब्रुदूक येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या आठही जणांना रविवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या आठही रुग्णांच्या चौदा दिवसांनंतर घेण्यात आलेल्या दोन्ही स्राव नमुना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, ‘करोना’ आजारातून बरे होणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या बारा झाली आहे. जिल्ह्यात ‘करोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. वेळीच केलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यानंतर रुग्णावर झालेले योग्य उपचार, यामुळे रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. रविवारी संगमनेर तालुक्यातील चार तर जामखेड येथील चार रुग्णांचे १४ दिवसांनंतरचे स्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. ‘करोना’मुक्त झालेल्या या आठ रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणसाठी संगमनेर आणि जामखेड येथे दाखल केले जाणार आहे. आतापर्यंत बारा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kedar Jadhav: IPL 2021: मराठमोळ्या केदार जाधवचं काय झालं; चेन्नईने दिली संधी की डच्चू, पाहा… – ipl 2021: chennai super kings team release kedar...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुढच्या वर्षीच्या आयपीएलची जोरदार तयारी आता करत आहे. चेन्नईने हरभजन सिंग, पीयुष चावला...

yami gautam career: सिनेसृष्टीतील करिअरला ११ वर्षे पूर्ण; यामी गौतमनं शेअर केली खास पोस्ट – yami gautam shares pic from jaisalmer where she shot...

मुंबई: ‘काबिल’, ‘उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ असे हिट चित्रपट देणारी अभिनेत्री यामी गौतम सध्या राजस्थानात जैसलमेर इथं तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करतेय....

Recent Comments