Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: आठ जणांची ‘करोना’वर मात - eight men beat 'corona'

ahmednagar news News: आठ जणांची ‘करोना’वर मात – eight men beat ‘corona’


हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, जिल्ह्यात बारा जण ‘करोना’मुक्त

म. टा. प्रतिनिधी, नगर

जिल्ह्यातील ‘करोना’बाधित असलेल्या आणखी आठ जणांनी या आजारावर मात केली आहे. यामध्ये जामखेड येथील चार, संगमनेर येथील तीन व आश्वी ब्रुदूक येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या आठही जणांना रविवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या आठही रुग्णांच्या चौदा दिवसांनंतर घेण्यात आलेल्या दोन्ही स्राव नमुना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, ‘करोना’ आजारातून बरे होणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या बारा झाली आहे.

जिल्ह्यात ‘करोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. वेळीच केलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यानंतर रुग्णावर झालेले योग्य उपचार, यामुळे रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. रविवारी संगमनेर तालुक्यातील चार तर जामखेड येथील चार रुग्णांचे १४ दिवसांनंतरचे स्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. ‘करोना’मुक्त झालेल्या या आठ रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणसाठी संगमनेर आणि जामखेड येथे दाखल केले जाणार आहे. आतापर्यंत बारा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

रविवारी आठही जणांना दोन रुग्णवाहिकेतून जामखेड आणि संगमनेर येथे हलविण्यात आले. त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर आणि ठणठणीत असल्याचे आणि ते पूर्णपणे बरे झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. या आठ जणांवर नगर शहरातील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या रुग्णांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला, असेही ते म्हणाले.

…….

१९ जणांचे स्राव नमुने पाठवले

‘जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत १९ व्यक्तींच्या घशातील स्राव नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यात, १६ नवीन रुग्ण असून इतर तीन जणांमध्ये २ व्यक्तींचे १४ दिवसानंतर दुसरा अहवाल तर एका व्यक्तीचा १४ दिवसांनंतर पहिला अहवाल आहे. या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे,’ अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २९ ‘करोना’ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बारा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, कोपरगाव येथील एक व जामखेड येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

…….

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या तालुकानिहाय व्यक्ती :

नगर : ०२

संगमनेर : ०४

नेवासे : ०१

जामखेड : ०४

परदेशी नागरिक : ०१

……

जामखेडच्या मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

जामखेड येथील एका व्यक्तीचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या व्यक्तीची ‘करोना’ अनुषंगाने तपासणी करण्यासाठी त्याचा नमुना पुणे येथील प्रयोगशाळेला पाठवला होता. शनिवारी रात्री त्याचा अहवाल आला असून तो ‘करोना’बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी ही माहिती दिली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Tamil Nadu Lockdown Extended Till 31 March – Tamil Nadu : तामिळनाडूत लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ | Maharashtra Times

हायलाइट्स:तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी ६ एप्रिल रोजी मतदानलॉकडाऊन निर्बंध कडक करण्याचा राज्य सरकारचा निर्णयतामिळनाडूमध्ये येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनचेन्नई :तामिळनाडू विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या...

मोबाइल हिसकावणाऱ्या दोघांना पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, घराकडे परतत असणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी रविवारी दोन जणांना अटक केली. दोघा आरोपींना सोमवारपर्यंत (एक मार्च) पोलिस...

Recent Comments