Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: एकाच व्यक्तीमुळे सात जणांना बाधा - injured seven people...

ahmednagar news News: एकाच व्यक्तीमुळे सात जणांना बाधा – injured seven people by a single person


जामखेडला आढळले आणखी दोन रुग्णम टा प्रतिनिधी, नगर’करोना’चा प्रसार कसा झपाट्याने होऊ शकतो, याचे उदाहरण जामखेडमध्ये पहायला मिळाले आहे…

Updated:

MT

जामखेडला आढळले आणखी दोन रुग्ण

म. टा. प्रतिनिधी, नगर

‘करोना’चा प्रसार कसा झपाट्याने होऊ शकतो, याचे उदाहरण जामखेडमध्ये पहायला मिळाले आहे. येथे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सात जणांना लागण झाल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरूच आहे.

जामखेडमध्ये तबलिगींच्या संपर्कामधून प्रथम ‘करोना’चा शिरकाव झाला. सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्ण बरे होऊन घरी गेले; मात्र, त्यांच्या संपर्कातून पुढे उघड होत जाणारे रुग्ण सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी जामखेडमध्ये एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींची तपासणी सुरू झाली. त्यामध्ये त्या रुग्णाची दोन्ही मुले ‘करोना’बाधित आढळून आली. पुढे त्या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांना बुधवारी लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यापैकी एकाच्या वडिलांना तर आज त्यांच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच ‘करोना’मुळे मृत झालेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सात जणांना बाधा झाल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे.

शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील चौघे बरे होऊन घरी परतले असताना सायंकाळी जामखेडमध्ये आणखी दोघे ‘करोना’बाधित आढळून आले. आधीच्या रुग्णांचे ते मित्र आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ४० झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जामखेडमधील १४ जणांचा समावेश आहे. बुधवारी बाधित आढळलेल्या २ व्यक्तींचे हे दोघे मित्र आहेत. एक जण २३ वर्षांचा तर दुसरा १६ वर्षांचा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad administration: एकावेळी फक्त पाचच ग्राहक – aurangabad administration has issued notice over rules and regulation for prevent second wave of corona

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद शहरात करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. पालिकेने मंगळवारी प्रशासनाने मंगल कार्यालयांसाठी निर्बंध आणि नियम...

‘या’ इंडियन कंपनीने चीनच्या शाओमी-रियलमीला मागे टाकले

नवी दिल्लीः ऑडियो प्रोडक्ट्सचे मार्केट गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. भारतात ऑडियो वियरेबल्स खूप प्रसिद्ध आहे. इंडियन युजर्ससाठी नवीन स्मार्टफोन्स प्रमाणे ऑडियो प्रोडक्ट्सची...

Recent Comments