Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: एप्रिल महिन्यात पूर्ण पगार मिळणार - will receive full...

ahmednagar news News: एप्रिल महिन्यात पूर्ण पगार मिळणार – will receive full salary in april


राज्य सरकारने एप्रिल महिन्यातील पगार एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे एप्रिल महिन्यात पूर्ण पगार मिळणार आहे…

Updated:

MT

नगर : राज्य सरकारने एप्रिल महिन्यातील पगार एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात पूर्ण पगार मिळणार आहे. पगार बिलांबाबत राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात येणार आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेने राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यातील पगार दोन टप्प्यांत करण्यात आले. मार्च महिन्यातील पहिल्या टप्प्यातील साधारण ७५ टक्के पगार शिक्षकांना मिळाला आहे. उर्वरीत २५ टक्के पगाराबाबत स्वतंत्र आदेश देण्यात येणार असल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्यात मात्र एकाच टप्प्यात पगार देण्यात येणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले आहे. शावेतन प्रणालीतील अडचणी होत्या. आता या प्रणालीतील सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर महिन्यास १८ तारखेपर्यंत सर्व शिक्षकांचे पगार होत आहेत. काही जिल्ह्यांतील शिक्षकांचे पगार अद्याप केले नसल्याची माहिती आहे. मात्र, या शिक्षकांचे पगार लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत शिक्षण आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात आली. त्यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगार बिलांबाबत आवश्यक सूचना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले, असे संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी सांगितले.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Vivo Y1s: Vivo Y1s पॉवरफुल फीचर्ससोबत भारतात लाँच, किंमत ७९९० ₹ – vivo y1s with helio p35 soc launched in india, price at rs...

नवी दिल्लीः टेक ब्रँड विवोकडून भारतीय मार्केटमध्ये नवीन एन्ट्री लेवल स्मार्टफोन Vivo Y1s लाँच करण्यात आला आहे. विवो इंडियाच्या अधिकृत साइट लिस्टिंगवरून Vivo...

gujarat high court: बॉसच्या पत्नीने केला FIR; मसाज पार्लरमधील रशियन गर्लफ्रेंड हायकोर्टात – russian massage therapist moves gujarat high court over fir by boss...

अहमदाबाद: मसाज पार्लरच्या बॉसच्या पत्नीने केलेल्या एफआयआरविरोधात पार्लरमध्ये काम करणाऱ्या रशियन मसाज थेरपिस्टने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बॉसच्या पत्नीने या रशियन...

Recent Comments