Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: औद्योगिक चाकांना ‘सर्व्हर’ची अडचण - problem with 'server' for...

ahmednagar news News: औद्योगिक चाकांना ‘सर्व्हर’ची अडचण – problem with ‘server’ for industrial wheels


नगर एमआयडीसीतील कारखाने सोमवारपासून (२० एप्रिल) सुरू करण्याची उद्योजकांची तयारी होती…

Updated:

MT

नगर : नगर एमआयडीसीतील कारखाने सोमवारपासून (२० एप्रिल) सुरू करण्याची उद्योजकांची तयारी होती. परंतु, यासाठीच्या परवानगीसाठी एमआयडीसी कार्यालयाला पाठवायच्या ऑनलाइन अर्जासह सेल्फ डिक्लेरेशन प्रक्रियेला ‘सर्व्हर डाउन’ची अडचण आली. त्यामुळे काही उद्योग सोमवारपासून तर बाकीचे बहुतांश उद्योग मंगळवारपासून (२१ एप्रिल) सुरू होण्याची शक्यता आहे.

‘करोना’बाधित प्रदेशापासून दूर असलेल्या तसेच महापालिका हद्दीबाहेर असलेल्या औद्योगिक क्षेत्राला कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील औद्योगिक चाके सोमवारपासून फिरण्यास सुरुवात होणार आहे. नगरचे औद्योगिक क्षेत्रही सोमवारपासून सुरू होण्याची आशा होती व तशी तयारीही उद्योजकांनी केली होती. पण यासाठीच्या ऑनलाइन परवानगीसाठी ‘एमआयडीसी’ने दिलेली लिंक इंटरनेट गती कमी असल्याने ओपन होत नव्हती. सायंकाळी ‘एमआयडीसी’चे पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू झाले व इंटरनेट गती मिळाल्याने उद्योजकांचे अर्ज त्यावर अपलोड होऊ लागले. संबंधित कंपनीचे उत्पादन तसेच कामगार-कर्मचारी संख्या नमूद करण्यासह करोना प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांबाबतचे प्रतिज्ञापत्र यात भरून दिले गेले आहे. या अर्जानुसार ‘एमआयडीसी’कडून परवानगी मिळाल्यावर लगेच कारखाने सुरू करण्याची तयारी उद्योजकांची आहे. त्यामुळे ज्यांचे अर्ज ‘एमआयडीसी’ कार्यालयाकडे पोहोचले व ज्यांना परवानगी मिळाली, त्यांचे कारखाने सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. बाकी कारखाने मंगळवारपासून सुरू होतील, असा विश्वास उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : एनसीबीचे आरोपपत्र – sushant singh rajput death case : first charge sheet has filed in sushant...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करत असतानाच त्यात काही व्हॉट्सअॅप संभाषणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे रॅकेट उजेडात आल्याने नार्कोटिक्स...

Recent Comments