Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: कंपन्यांपुढे कामगार आणण्याचे आव्हान - the challenge for companies...

ahmednagar news News: कंपन्यांपुढे कामगार आणण्याचे आव्हान – the challenge for companies to bring in workers


‘एमआयडीसी’मध्ये दुचाकी ‘नॉट अलाऊड’; प्रतिज्ञापत्राचाही संभ्रम कायम

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगरची एमआयडीसी सोमवारी काहीअंशी व मंगळवारी (२१ एप्रिल) पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता असली तरी औद्योगिक क्षेत्रात दुचाकी वाहनांना परवानगी नसल्याने कामगार-कर्मचाऱ्यांना कंपन्यांत आणण्याचे आव्हान उद्योजकांसमोर आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे कामगार-कर्मचारी आणण्यास सांगण्यात आले असले तरी महापालिकेची बससेवा बंद असल्याने तीही अडचण झाली आहे. खासगी बसेसची व्यवस्था करायची असेल तर त्यासाठी आरटीओच्या परवानगीचीही व्यवस्था करावी लागणार आहे. दरम्यान, कंपनी सुरू करताना करोना प्रादुर्भाव रोखण्याबाबतच्या वैयक्तिक व सामुदायिक कर्तव्यांबाबतचे प्रतिज्ञापत्र फक्त कंपनी मालक व भागीदारांनी भरून द्यायचे की, कंपनीतील प्रत्येक कामगार-कर्मचाऱ्यांकडून भरून घ्यायचे, याबाबतचा संभ्रम कायम होता.

नगरला करोनाबाधित रुग्ण जास्त असल्याने केंद्र सरकारच्या हॉट स्पॉट यादीत नगर आहे. राज्य सरकारने रुग्ण संख्येनुसार केलेल्या झोनमध्येही नगर रेडझोनमध्ये आहे. मात्र, नगरचे नागापूर औद्योगिक क्षेत्र मनपा हद्दीबाहेर असल्याने पारनेर व सुपे येथील औद्योगिक क्षेत्रही मनपा हद्दीत येत नसल्याने या परिसरातील कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली गेली आहे. यासाठी उद्योजकांना वा कंपनी व्यवस्थापनाला एमआयडीसी कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज करण्यासह प्रतिज्ञापत्रही भरून देण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी नागापूर, सुपे व पारनेर येथील उद्योजकांनी असे अर्ज व प्रतिज्ञापत्र भरून देण्याचे काम सुरू केले. पण एमआयडीसी कार्यालयाने यासाठी दिलेली लिंक इंटरनेट गती नसल्याने ओपन होण्यास वेळ लागत होता. त्यामुळे एमआयडीसी पोर्टलवर अर्ज अपलोड होण्याची गतीही कमी होती. सायंकाळी मात्र इंटरनेट सुविधा बऱ्यापैकी गतिमान झाल्यावर अर्ज अपलोड होऊ लागले. या अर्जांवर सायंकाळी एमआयडीसीकडू़न येणाऱ्या परवानगीनुसार संबंधित कारखाने सोमवारपासूनच सुरू करण्याचे नियोजन काही उद्योजकांनी व मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाचे सुरू होते. मंगळवारपासून मात्र बहुतांश कारखाने सुरू होतील, असेही सांगण्यात आले.

कामगार-कर्मचाऱ्यांची अडचण

औद्योगिक क्षेत्रात दुचाकी वाहने आणण्यास मनाई करण्यात आली आहे. कामगार-कर्मचाऱ्यांना दुचाकीवरून येण्यास परवानगी दिली तर एकाचवेळी कारखान्यांच्या दरवाजावर गर्दी होण्याची शक्यता आहे. करोना प्रादूर्भाव रोखण्य़ासाठीच्या उपाययोजनांमध्ये गर्दी टाळण्यास विशेष प्राधान्य आहे. त्यामुळे कामगार-कर्मचाऱ्यांना शहर बससेवा वा खासगी बसेसमधून कारखान्यांत आणण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कारखाने सुरू केले तरी कामगार-कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे कामावर आणण्यासाठीच्या सुविधांचे आव्हान कंपन्यांसमोर आहे. याशिवाय, दुसरीकडे अनेक कामगार-कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याचेही सांगितले जाते. करोनाच्या भीतीमुळे कुटुंबीय कामावर जाऊ नका, म्हणून सांगत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामगार-कर्मचाऱ्यांची कामावर येण्याची मानसिकता तयार करण्याचेही प्रयत्न उद्योजक व व्यवस्थापनाद्वारे सोमवारपासून सुरू होते.

उद्योजकांनी केली चर्चा

कारखाने सुरू करण्याबाबत सरकारने परवानगी दिली असली तरी कामगार-कर्मचाऱ्यांना दुचाकीवर येण्यास परवानगी देण्याबाबत सवलत मिळण्यासाठी नगरमधील काही उद्योजकांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. पण करोना प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये गर्दी टाळणे महत्त्वाचे असल्याने कामगार-कर्मचाऱ्यांना दुचाकीवर येण्यास परवानगी देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कामगार-कर्मचाऱ्यांना कामावर आणण्यासाठी अन्य सुविधा करण्याची तयारी उद्योजकांनी सुरू केली. या चर्चेत उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या नगरच्या शाखेचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, उपाध्यक्ष प्रकाश गांधी तसेच केडगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सतीश बोरा, पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरातील उद्योजकांचे प्रतिनिधी संतोष बोथरा, इटॉन कंपनीचे एचआर व्यवस्थापक राजेश पेवाल, उद्योजक अरुण कुलकर्णी, मिलिंद गंधे आदी सहभागी झाले होते.

प्रतिज्ञापत्राबाबत संभ्रम

कंपनी सुरू करण्याबाबतच्या परवानगी अर्जासमवेत द्यावयाच्या प्रतिज्ञापत्राबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ‘कंपनीतील कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाइल, करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिक म्हणून माझीही वैयक्तिक जबाबदारी राहील, माझ्या घराशेजारी वा परिसरात राहणारांपैकी कोणालाही करोनाची बाधा झालेली नाही, कोणामध्ये करोना वा त्यासदृश्य आजाराची लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय क्षेत्राशी संपर्क साधेल’…अशा विविध मुद्यांवर भरून द्यावयाचे हे प्रतिज्ञापत्र कंपनी मालक-भागीदार व व्यवस्थापन प्रतिनिधी यांनीच फक्त भरून द्यायचे की, कंपनीतील प्रत्येक कामगार-कर्मचाऱ्याकडून भरून घ्यायचे, याचा संभ्रम कायम होता. मात्र, उद्योजकांनी आधी कंपनी सुरू होण्यासाठीचे अर्ज व स्वतःचे प्रतिज्ञापत्र भरून देण्यास पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

world Test championship: IND vs ENG : विजयानंतरही भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बसू शकतो धक्का, पाहा समीकरण… – ind vs eng : if team...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने या मालिकेत २-१ अशी...

PM Modi: pm modi : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर PM मोदी म्हणाले, ‘दलालांमुळे शेतकऱ्याची…’ – pm modi address bjp rally in coimbatore our govt that had...

कोईम्बतूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ) यांची कोईम्बतूरमध्ये प्रचारसभा झाली. सरकार सर्व वर्गाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. मी नुकताच एका कार्यक्रमातून...

Recent Comments