Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : गुपचूप राहणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा - crime against a...

ahmednagar news News : गुपचूप राहणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा – crime against a couple living in secret


म. टा. प्रतिनिधी, नगर

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असताना विनापरवाना प्रवास करून भिंगार येथे गुपचूप रहात असलेल्या संगमनेरमधील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज पांडुरंग चव्हाण व अर्चना पंकज चव्हाण अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही त्यांच्या दोन मुलांसह खळेवाडीतील देवनगरी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गुपचूप रहात असल्याची माहिती गावात गस्त घालताना भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या कुटुंबाचा शोध घेण्यात आला. पंकज व अर्चना हे दोघेही आपल्या सहा व तीन वर्षांच्या मुलांसह संगमनेर येथून कारमधून प्रवास करुन विनापरवाना येऊन येथे गुपचूप रहात असल्याची कबुली दिली; तसेच त्यांनी रुग्णालयात स्वतःची तपासणी केली नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

केळी वाटप करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

मुकुंदनगर येथे परवानगी न घेता केळी वाटप केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फैयाज शेख, फरान फैयाज शेख, अर्शद आयुब शेख, अरिफ सय्यद शेख, तोसिफ शेख (सर्व रा. मुकुंदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जमावबंदीचे उल्लंघन करुन विनापरवाना केळी वाटप करताना हे सर्वजण भिंगार पोलिसांना आढळून आले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Iqbal Mirchi: मुंबई : मिर्चीचे कुटुंबीयही ‘परागंदा आर्थिक गुन्हेगार’ – court declares iqbal mirchi’s family members fugitive economic offenders

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दिवंगत निकटवर्तीय व कुख्यात गँगस्टर इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची याची पत्नी हाजरा तसेच मुले आसिफ व...

Recent Comments