Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : चोरट्यांनी सॅनिटायझरचा ट्रक पळविला पण…... - thieves hijack...

ahmednagar news News : चोरट्यांनी सॅनिटायझरचा ट्रक पळविला पण…… – thieves hijack truck of sanitizer but …


म.टा. प्रतिनिधी, नगर

नगर-सोलापूर महामार्गावर लुटमारीसाठी कुप्रसिध्द असलेल्या पाटेवाडी शिवारातून चोरट्यांनी सॅनिटायझरचा ट्रक पळविला. मात्र, पोलिसांनी तातडीने चालचाल केल्याने काही अंतरावर ट्रक सोडून चोरटे पसार झाले. ट्रकमध्ये २१ लाख रुपये किमतीच्या सॅनिटायझरच्या बाटल्या होत्या.

बुधवारी रात्री ही घटना घडली. गुजरातमधून सॅनिटाझर घेऊन हा ट्रक केरळकडे निघाला होता. ट्रकचालक मनिवेल पेरूमल (रा. तामिळनाडू) आपल्या सहकाऱ्यासह जात असताना पाटेवाडी शिवारात दुचाकी आणि मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडविले. मारहाण करून ट्रक घेऊन करमाळ्याच्या दिशेने निघून गेले. चालकाने ही माहिती पोलिसांना दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव व पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तातडीने हाचचाली सुरू केल्या. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याचे लक्षात आल्यावर करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे ट्रक सोडून चोरटे पसार झाले. पोलिसांनी ट्रक कर्जत पोलिस ठाण्यात आणला. आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात ट्रक लुटीच्या घटना नेहमीच घडतात. यावेळी प्रथमच सॅनिटायझर चोरून नेण्याचा प्रयत्न झाला. ट्रकमध्ये अन्य काही माल असावा, या संशयाने चोरट्यांनी ट्रक पळविला की त्यांना सॅनिटायझरच चोरून न्यायचे होते, हे स्पष्ट झालेले नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

final year exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा संपल्या; दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा – mumbai university final year exams 2020 ended successfully, over...

Mumbai University Exams 2020: ऑक्टोबर- मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्या. दिनांक २५...

Nawab Malik: Nawab Malik: लोकल सुरू करायला राज्य सरकार तयार!; ‘या’ मंत्र्याचा गोयल यांच्यावर आरोप – restore local train service in mumbai says nawab...

मुंबई: 'मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो कमी करण्यासाठी नियमित लोकलसेवा सुरू करण्यात यावी', अशी अत्यंत महत्त्वाची मागणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री...

shiv sena vs ncp: आयुक्तांच्या दालनात काय घडलं पाहा; आमदारांसह सगळेच हादरले – ahmednagar delegation of traders met the municipal commissioner

नगर:नगर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गाळेधारक व व्यापारी यांच्यावर राजकीय आकसपोटी होणारी कारवाई थांबवावी, अन्यथा कुटुंबासह सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, अशा आशयाचे...

Recent Comments