Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : जामखेडच्या पिचवर रोहित पवारांचा भाजपला आणखी एक धक्का!...

ahmednagar news News : जामखेडच्या पिचवर रोहित पवारांचा भाजपला आणखी एक धक्का! – ncp regains power in jamkhed municipality


नगर: मागील नगराध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपसोबत गेलेले नगराध्यक्ष निखिल घायतडक व त्यांच्या दहा सहकारी नगरसेवकांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन त्यांनी आज हा निर्णय जाहीर केला. ‘जे स्वखुशीने येतील त्यांना सोबत घेऊन काम करू’, असे सांगत यावेळी पवार यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला. त्यामुळे आता जामखेड नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे.

वाचा: रोहित पवारांनी ‘कर्जत-जामखेड’साठी आणला ‘स्मार्ट’ प्रकल्प

माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि भाजपला हा मोठा धक्का आहे. या घडामोडीने भाजप अंतर्गत सत्ता संघर्ष आणि नगराध्यक्ष राजीनामा नाट्याचा असा समारोप झाला. नगराध्यक्ष बदलण्यासाठी भाजपमधून घायतडक यांच्यावर दबाव येत होता. सुरुवातीला त्यांनी आणि दहा नगरसेवकांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली. नंतर अचानक राजकारण बदलून या सर्वांनी राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार प्रथमच नगर पालिकेत आले. तेथे या अकरा जणांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

वाचा: ‘ते’ लोक मला महिन्याभरापासून फोन करताहेत: रोहित पवार

यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘नगराध्यक्ष घायतडक व दहा नगरसेवकांनी माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचे मी स्वागत करतो. तसेच शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठी जे माझ्या सोबत येतील त्यांना मी माझ्या सोबत घेणार आहे. हे सर्व नगरसेवक पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच निवडून आलेले आहेत. नागरिकांनी त्यावेळीही राष्ट्रवादी म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. हे सर्वजण परत येणार असल्याचे कळले म्हणून मी प्रथमच नगरपालिकेत आलो आहे. या मतदारसंघात मी निवडून येण्यासाठी तुम्हा सर्वांचा वाटा आहेच. आता नगरपालिकेच्या माध्यमातून जामखेड शहरातही चांगली कामे करू.’

नगराध्यक्ष घायतडक, माजी नगराध्यक्षा प्रीती विकास राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गुलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात, सुमन आशोक शेळके , मेहरुनिसा शफी कुरेशी, जकीया आयुब शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

घायतडक यांनी अशी वाचवली सत्ता

हे सर्व जण पूर्वी राष्ट्रवादीतच होते. नगराध्यक्ष पदासाठी भाजपमध्ये गेले. त्यावेळी राम शिंदे आमदार होते. घायतडक यांना नगराध्यक्ष करताना सव्वा वर्ष मुदत दिली होती. त्यांनतर त्यांनी राजीनामा देऊन दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यायचे असे ठरले होते. मधल्या काळात विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला. त्यामुळे बदलाचा विषय काही काळ मागे पडला होता. महिनाभरापूर्वी तो पुन्हा उफाळून आला आणि पद सोडण्यास तयार नसलेल्या घायतडक यांच्यावर दबाव वाढला. त्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीची वाट धरत आपली सत्ता वाचविली आहे.

वाचा: हे सरकार खोटं बोलत नाही, मुख्यमंत्रीही उद्धट नाहीत: मेधा पाटकरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pankaja Munde Tweet: गुन्हा दाखल झाल्यामुळं पंकजा मुंडे भडकल्या! – pankaja munde tweet after police book her for violating social distance rule

बीड: सुरक्षित वावराचे नियम मोडल्याबद्दल भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे समजताच पंकजा यांनी संताप व्यक्त...

realme c17: Realme C17 भारतात येतोय, किंमत कमी, फीचर्स जास्त – realme new smartphone realme c17 to launch in india after diwali check price,...

नवी दिल्लीःरियलमी लवकरच भारतात एन्ट्री लेवल स्मार्टफोन सेगमेंट मध्ये जबरदस्त मोबाइल Realme C17 लाँच करणार आहे. याचे फीचर्स जबरदस्त आहेत. तसेच कॅमेरा क्वॉलिटी...

Recent Comments