Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: जामखेड शहराच्या ‘लॉकडाउन’मध्ये वाढ - increase in lockdown of...

ahmednagar news News: जामखेड शहराच्या ‘लॉकडाउन’मध्ये वाढ – increase in lockdown of jamkhed city


आणखी एक ‘करोना’बाधित आढळल्याने खबरदारी

म. टा. प्रतिनिधी, नगर

‘करोना’चे रुग्ण आढळल्यामुळे जामखेड शहर यापूर्वीच ‘हॉट स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, जामखेड येथे १८ एप्रिलला आणखी एक ‘करोना’बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जामखेडमधील प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत एक मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील सर्व अत्यावश्यक सेवांची दुकानेही एक मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याभागात वाहनांना, नागरिकांना येण्याजाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश दिले आहेत.

जामखेड शहरासाठी कर्जतचे उपविभागीय अधिकारी हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकिंग सुविधा बँक प्रतिनिधींमार्फत उपलब्ध करुन द्याव्यात. पोलिस विभागाने सर्व पर्यायी रस्ते बंद करुन एकच रस्ता बॅरिकेड्सद्वारे खुला ठेवावा. या क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना संबंधित सनियंत्रण अधिकाऱ्यांनी ओळखपत्र द्यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नियंत्रण कक्ष राहणार कार्यरत

जामखेड येथील नागरिकांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू प्रशासनाकडून सशुल्क पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी २४ बाय ७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामध्ये अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी, व यासर्वांचे मोबाइल नंबर प्रसिद्ध करण्यात यावेत. याशिवाय नागरिकांकडून येणाऱ्या फोनची रजिस्टरमध्ये नोंद करून घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू सशुल्क पुरविण्यात याव्यात. जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी पुरवठादार निश्चित करून, पथके तयार करून खरेदी-विक्री आणि वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments