Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू - the death of...

ahmednagar news News: झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू – the death of a leopard trapped in a tree branch


नेवासे तालुक्यातील सोनईजवळ असलेल्या बेल्हेकरवाडी येथील ज्ञानदेव बेल्हेकर यांच्या शेतात असलेल्या जांभळीच्या झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू …

Updated:

MT

नेवासे : नेवासे तालुक्यातील सोनईजवळ असलेल्या बेल्हेकरवाडी येथील ज्ञानदेव बेल्हेकर यांच्या शेतात असलेल्या जांभळीच्या झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाला.

बेल्हेकरवाडी परिसरात रानडुकरे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी लोखंडी खटके लावले आहेत. शिकारीच्या शोधात बिबट्या या खटक्यामध्ये अडकला. मजबूत खटका उपटून तो झाडावर चढला. मात्र, झाडांच्या फांद्यात खटक्यासह त्याचा पाय अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.

शेतकरी पांडूरंग बेल्हेकर यांना बेल्हेकरवाडी-होनवस्ती रस्त्यावरील शेतातील जांभळाच्या झाडावर मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला. विनायक निमसे व अप्पासाहेब निमसे, सरपंच भरत बेल्हेकर व पोलिस पाटील अशोक वैरागर यांनी घटनास्थळी भेट देऊन ही माहिती वन विभागाला दिली. वनपाल डी. बी. झिंजुर्डे, वनरक्षक गाडे, वन कर्मचारी ढेरे यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याला झाडावरून खाली घेतले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘करोना’चा ‘जीएसटी’ला फटका

म. टा. प्रतिनिधी, लॉकडाऊन, करोनाचे संकट याचा मोठा फटका राज्य कर विभागाला ( सीजीएसटी) बसला आहे. गेल्या सहा महिन्यात औरंगाबाद विभागात केवळ ५२६...

Rohit Sharma: AUS vs IND: रोहित शर्माच्या जागेवर हक्क सांगणारे तिन्ही फलंदाज पहिल्याच सामन्यात झाले फेल – aus vs ind: lokesh rahul, mayank agarwal...

सिडनी, AUS vs IND: रोहित शर्माने आतापर्यंत भारताला बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. रोहितच्या दमदार सुरुवातीच्या जोरावर भारताने बरेच सामने जिंकले...

Kangana Ranaut Share Photo With Sanjay Dutt Netizen Trolled Her – संजय दत्तला भेटायला गेली कंगना रणौत, यूझर्स म्हणाले- शेवटी नेपोकिड, चरसीसोबत बसलीस

मुंबई- सध्या कंगना रणौत तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे घरापासून दूर आहे. सध्या ती एकाचवेळी 'थलायवी' आणि 'धाकड' या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दरम्यान,...

farmers protest on burari nirankari ground: अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत एन्ट्री, बुराडी मैदानात आंदोलनाची परवानगी – farmer protest delhi burari nirankari ground police permission farm...

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत एन्ट्री मिळालीय. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांना...

Recent Comments