Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : टाकळी ढोकेश्वर येथून उन्नावचे २३ विद्यार्थी रवाना -...

ahmednagar news News : टाकळी ढोकेश्वर येथून उन्नावचे २३ विद्यार्थी रवाना – 23 students of unnao leave from takli dhokeshwar


म. टा. वृत्तसेवा, पारनेर

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून वर्षाच्या आदान प्रदान अभ्यासक्रमासाठी आलेले २३ विद्यार्थी व त्यांच्यासमवेत दोन शिक्षक रविवारी सकाळी बसमधून त्यांच्या गावी रवाना झाले. याच बसमधून उन्नाव येथे असलेले टाकळी ढोकेश्वर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी परत येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

नवोदय विद्यालयातील नववीमधील विद्यार्थ्यांसाठी आदान प्रदान अभ्यासक्रमांतर्गत एका राज्यातील विद्यार्थी दुसऱ्या राज्यातील संस्कृती, सामाजिक परिस्थिती व शैक्षणिक वातावरणाच्या अभ्यासासाठी जातात. त्याअंतर्गत उऩ्नाव येथील विद्यार्थी नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर जवाहर नवोदय विद्यालयात आले होते. तर, टाकळी ढोकेश्वर येथील विद्यार्थी उन्नाव येथे या उपक्रमांतर्गत गेले होते. एप्रिल महिन्यात त्यांचा अभ्यास संपून ते परतीच्या प्रवासाला निघणे अपेक्षित होते. केंद्र सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाउऩ घोषित केल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी हे विद्यालयाच्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कानावर ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने सुत्रे हलवत आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला. नगर जिल्हा प्रशासनाने उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून परवानगीचे सोपस्कार पार पाडले. त्यानंतर रविवारी सकाळी उन्नाव येथील १५ विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली. उन्नाव येथे जाणाऱ्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यासमवेत इतर आरोग्य साधने देण्यात आली आहेत.

रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास टाकळी ढोकेश्वर येथून २३ विद्यार्थ्यांना घेऊन ही बस सुरक्षित वावर व जिल्हा प्रशासनाच्या आदेशांचे पालन करत उन्नावच्या दिशेने रवाना झाली. या वेळी त्यांच्यासमवेत शिक्षक व शिक्षिकाही होत्या. या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह प्राचार्य एस. एस. बी. बोरसे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सुमारे साडेबाराशे किलोमीटर अंतर असलेल्या उन्नाव येथे जाण्यासाठी किमान दीड दिवस लागण्याची शक्यता आहे. उन्नाव येथून टाकळी ढोकेश्वर येथील विद्यार्थी परतीचा प्रवास करत बुधवारी येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

फोटो ओळी –

टाकळी ढोकेश्वर येथे आलेल्या उन्नाव येथील २३ विद्यार्थी व शिक्षकांना रविवारी सकाळी बसने रवाना करण्यात आले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jalgaon breaking news: Jalgaon: रात्र झाली तरी आई व दोन मुलं शेतातून परतली नाहीत; शोध घेत असतानाच… – mother and two children found dead...

हायलाइट्स:जळगावात एका विहिरीत आई व दोन मुलांचे मृतदेह आढळले.भडगावमधील कनाशी गावातील घटनेचे गूढ अद्याप कायम.आत्महत्या की घातपात, पोलीस घेत आहेत शोध.जळगाव:जळगाव जिल्ह्यातील भडगाव...

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

Recent Comments