Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : डॉ. अमोल बागुल बनलेत ‘समाज शिक्षक’ - dr....

ahmednagar news News : डॉ. अमोल बागुल बनलेत ‘समाज शिक्षक’ – dr. amol bagul becomes ‘social teacher’


नागरिकांसाठी रस्त्यावर, तर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन

म. टा. प्रतिनिधी, नगर

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काय दक्षता घ्यायची, याची माहिती देण्यासाठी सरकारी भरारी पथकासोबत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरायचे. शाळा बंद असल्याने विद्यार्थांना ऑनलाइन मार्गदर्शन करायचे, असा दिनक्रम आहे येथील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. अमोल बागुल यांचा. गेल्या महिनाभरापासून ते स्वयंस्फूर्तीने दररोज ८ तास आपले योगदान देत आहेत.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, जिल्हा पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तसेच नगर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी उमेश पाटील, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बागुल काम करीत आहेत. आपत्ती प्राधिकरण समितीच्या कार्यवाहीनुसार नगर शहर व नगर तालुक्यातील विविध नियोजित ठिकाणांवर जाऊन प्रबोधन सुरू आहे. भरारी पथकाच्या वाहनावर ध्वनिक्षेपकातून दैनंदिन निवेदन, मास्क लावणे, अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानासमोर सुरक्षित वावर नियमाचा वापर करत चौकोन, वर्तुळ आखण्यासाठी आग्रह धरणे, प्रशासनाच्या आवश्यक सूचनांचा प्रचार-प्रसार करणे, करोना प्रतिबंधक कालावधीतील नियम व कायदे यांची माहिती देणे, विलगीकरण प्रक्रियेबद्दल माहिती देणे, आपली वाहने घेऊन अनावश्यक फिरणाऱ्यांना सूचना व समज देणे, शिवभोजन थाळी, बँका, स्वस्त धान्य दुकाने आदी आस्थापनांसमोरील उभ्या नागरिकांना शिस्त लावणे, अशी कामे सुरू आहेत. जिल्हा पोलिस दल, जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालये, अहमदनगर महानगरपालिका या कार्यालयाच्या वाहनांसाठी करोना प्रतिबंध प्रचार ध्वनिफीत बनवणे आदी उपक्रमांतदेखील बागुल यांचे योगदान आहे.

युनिसेफ व जागतिक आरोग्य संघटना यांच्या माध्यमातून दैनंदिन ऑनलाइन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील व्हिडिओ व अन्य साहित्य बनवून पाठवणे; तसेच त्यांच्या प्रबोधनपर सूचना व व करोना प्रतिबंध योजनांचा प्रचार-प्रसार करणे, सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्वयंसेवक व करोना वॉरियर्स योजनेअंतर्गत युनिसेफ वूमन व आरोग्य मंत्रालयाच्या श्री शक्ती चॅलेंज स्पर्धेचा प्रचार-प्रसार, आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडणे, इनोव्हेशन संशोधन स्पर्धा, यांच्या ऑनलाइन प्रचार-प्रसार या गोष्टीही बागुल करीत आहेत.

…………

देशासह राज्य व नगर शहर, जिल्हा अशा प्रतिकूल परिस्थितीत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता घरात बसू शकत नाही. त्यामुळे स्वतःची सुरक्षा घेत व कसलीही अपेक्षा न ठेवता मी हे काम करीत आहे. याशिवाय अध्यापनाचे नेहमीचे कामही ऑनलाइन सुरूच आहे.

– अमोल बागुल, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक

…………….Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

indian railway special train: Indian Railway : ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार ‘या’ १३ विशेष रेल्वे – indian railways 13 special train service extended till...

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या पूर्व - मध्य रेल्वे झोनकडून करोना काळात चालवण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ केल्याचं जाहीर करण्यात आलंय....

Pune: धक्कादायक! अंगावरील कपडे उतरवून तरुणाला बेल्टने मारहाण; व्हिडिओही काढला – 36 year old man abducted and beaten by belt in viman nagar pune

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाची रक्कम परत न केल्याने तरुणाच्या अंगावरील कपडे उतरवून त्याला पट्ट्याने मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडीओ काढून पैसे न...

Recent Comments