Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: ‘तहसील’मध्येही सॅनिटायझेशन कक्ष - sanitation room in 'tahsil' too

ahmednagar news News: ‘तहसील’मध्येही सॅनिटायझेशन कक्ष – sanitation room in ‘tahsil’ too


सावेडीत असणाऱ्या नगर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात सॅनिटायझर कक्ष उभारण्यात आला आहे यासाठी शरद पवार विचार मंचच्या वतीने पुढाकार घेण्यात आला…

Updated:

MT

नगर : सावेडीत असणाऱ्या नगर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात सॅनिटायझर कक्ष उभारण्यात आला आहे. यासाठी शरद पवार विचार मंचच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. हा कक्ष तहसीलदार उमेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी सुरू करण्यात आला आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सरकारी, खासगी कार्यालयांच्या बाहेर सॅनिटायझर कक्षही उभारण्यात येत आहे. शनिवारी नगर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरसुद्धा असा कक्ष उभारण्यात आला. या अद्ययावत सॅनिटायझर कक्षाची आकर्षक पद्धतीने बनावट करण्यात आली आहे. दर्शनी भागात ‘करोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संदेश देण्यात आले आहेत. बॅटरीवर चालणारी मोटार सॅनिटायझर कक्षात कार्यान्वित आहे. त्यामुळे लाइट गेली तरी हा कक्ष सुरू राहील. कक्षातून जाणाऱ्या व्यक्तीवर पायापासून तर डोक्यापर्यंत फवारणी यामध्ये होणार आहे.

तहसीलदार पाटील म्हणाले, ‘तहसील कार्यालयात विविध भागातून नागरिक अनेक कामे घेऊन येत असतात. त्यामुळे ‘करोना’च्या पार्श्‍वभूमीवर हा कक्ष उपयुक्त ठरेल. तर, मंचाचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी सामाजिक बांधिलकी जपत नगर तहसील कार्यालयासह आवश्यक सार्वजनिक ठिकाणीदेखील हा प्रकल्प निशुल्कपणे कार्यान्वित करून दिला जाणार असल्याचे सांगितले. या वेळी नायब तहसीलदार शिल्पा पाटील, पुरवठा निरीक्षक विश्‍वास आढाव, गिरीश गायकवाड, मंडल अधिकारी वृषाली करोसिया, एम. एच. पठाण आदी उपस्थित होते.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jalna khamgaon railway line: जालना खामगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात – work of jalna khamgaon railway line is in final stage

औरंगाबाद: राज्यात ४८ रेल्वेमार्ग सर्वेक्षण घोषित करण्यात आलेले आहेत. यात आतापर्यंत फक्त तीन मार्गाचेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल अंतिम करण्याचे...

Haryana: तरुणीचे अपहरण करून हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार, पीडितेने सांगितली आपबीती – hisar woman abducted and raped in haryana

हायलाइट्स:तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कारहरयाणातील हिसारमधील धक्कादायक घटनापीडितेने पोलिसांत केली तक्रार दाखल अपहरणकर्त्या तरुणांचा पोलिसांकडून शोध सुरू हिसार: हरयाणाच्या हिसारमधील एका गावातील एका...

mohan delkar suicide case: ‘डेलकरांना मरण यातना देणारे अजून मोकाट कसे?’ – nana patole criticized bjp over mohan delkar suicide case

हायलाइट्स:नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोलमोदी सरकारनं GDPची वाढ केली, असा टोलाही लगावला आहेमोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणीही पटोले यांनी मागणी केली आहे. मुंबईः...

Recent Comments