Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : 'ते' ५० प्रवासी राजस्थानकडे रवाना - 'they' 50...

ahmednagar news News : ‘ते’ ५० प्रवासी राजस्थानकडे रवाना – ‘they’ 50 passengers leave for rajasthan


म. टा. प्रतिनिधी, नगर ‘लॉकडाउन’मुळे नगरमध्ये अडकलेले राजस्थानमधील ५० प्रवासी शनिवारी रात्री बसने त्यांच्या गावाकडे रवाना झाले. आपुलकीने सांभाळ केल्याबद्दल या प्रवाशांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. २७ मार्चपासून ते नगरमध्ये महापालिकेच्या निवारागृहात होते.सरकारच्या निर्देशानुसार आता जिल्ह्यात अडकलेल्या विविध स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, इतर नागरिक यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी खास पथकाची स्थापना केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच निवारागृहात अडकलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात येत असून त्यांची परत पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यातच शनिवारी रात्री नगरमधून राजस्थानसाठी ५० प्रवासी बसने रवाना करण्यात आले. ‘लॉकडाउन’ काळात हे प्रवासी खासगी बसने जात असताना त्यांना ताब्यात घेऊन निवारागृहात दाखल करण्यात आले होते. शहरातील बडी साजन मंगल कार्यालय या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी त्यांना त्यांच्या घरी जाण्यास मिळणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने अतिशय आपुलकीने काळजी घेतल्याबद्दल यंत्रणेतील प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले. या प्रवाशांमध्ये राजस्थानमधील जालोर, बाडमेर या जिल्ह्यांतील लोकांचा समावेश होता. यामध्ये ४६ पुरुष व २ महिला तसेच २ लहान मुले आदी ५० जण होते. तर, त्यांच्यासमवेत असलेल्या आंध्र प्रदेश येथील वाहनचालकांना व त्याबरोबरच राजस्थानमधील करोली जिल्ह्यातील सुमारे १५ नागरिकांनासुद्धा त्यांच्या गावाला पाठवण्याची प्रक्रिया

सुरू केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kunkeshwar Fair: करोनाचा धसका! श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं साजरी होणार – sindhudurg: kunkeshwar fair of devgad cancelled due to coronavirus

हायलाइट्स:राज्यात करोनानं पुन्हा खाल्ली उचलधार्मिक कार्यक्रम, यात्रांवर निर्बंधकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्राही रद्दसुरेश कौलगेकर । सिंधुदुर्गदक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र...

Religious Freedom Act: Love Jihad : मध्य प्रदेश विधानसभेत ‘लव्ह जिहाद’विरोधात ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर – mp religious freedom act aims to penalize love jihad...

हायलाइट्स:याआधी, धर्मस्वातंत्र्य अध्यादेशाला राज्यपालांनी दिली होती मंजुरी'लव्ह जिहाद' विरोधात कडक शिक्षेची तरतूद१-१० वर्षांची कैद आणि १ लाखांपर्यंतच्या आर्थिक दंडाची तरतूदभोपाळ : मध्य प्रदेशात...

citrus estate: राज्य सरकारनं जाहीर केलेला ‘सिट्रस इस्टेट’ प्रकल्प नेमका आहे काय? – citrus estate to be set up in vidarbha; ajit pawar announce

हायलाइट्स:सिट्रेस इस्टेट प्रकल्प निर्माण करण्याचा सरकारचा मानसआज सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा६२ एकर जागेवर 'सिट्रस इस्टेट' स्थापना करण्यात येणारमुंबईः उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री...

Recent Comments