Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: दारू विक्रेत्यांचा स्टॉक तपासा - check the stock of...

ahmednagar news News: दारू विक्रेत्यांचा स्टॉक तपासा – check the stock of liquor dealers


निर्भय जीवन फाउंडेशची मागणीम टा प्रतिनिधी, नगर ‘शहरात बेकायदेशीर मद्य विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत…

Updated:

MT

निर्भय जीवन फाउंडेशची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नगर

‘शहरात बेकायदेशीर मद्य विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व परमिट रूम, वाइन शॉप व होलसेल विक्रेत्यांकडील स्टॉक तपासून तफावत आढळून आल्यास कारवाई करावी,’ अशी मागणी निर्भय जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भांबरकर यांनी केली आहे.

जिल्हाधिकऱ्यांना यासंबंधी पाठविलेल्या निवेदनात भांबरकर यांनी म्हटले आहे की, लाकडाउन असतानाही शहरात चढ्या भावाने बेकायदा दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. वास्तविक पहाता लॉकडाउन सुरू होताच उत्पादन शुल्क विभागामार्फत सर्व दारू विक्रीची ठिकाणे सील करण्यात आली आहेत. याचा अर्थ ही विक्री यापूर्वी बाहेर काढलेल्या स्टॉकची असल्याचा संशय आहे. त्यामुळे १९ मार्चला दुपारपासून दारू विक्री बंद करण्यात आली. दारू विक्रेत्यांना नियमानुसार दररोजच्या विक्रीचा आणि स्टॉकचा हिशोब ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रशासनाने बंदी केल्याच्या आधीच्या दोन दिवसांपासूच्या नोंदी आणि स्टॉक तपासण्यात यावा. त्यातून नेमके काय ते स्पष्ट होईल. ते पाहून पुढील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भांबरकर यांनी केली आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Recent Comments