Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : दीडशे कुटुंबांना अडीच कोटींची मदत - two and...

ahmednagar news News : दीडशे कुटुंबांना अडीच कोटींची मदत – two and a half crore assistance to one and a half hundred families


मोफत जनता अपघात विमा योजनेचे धनादेश वाटप

म. टा. प्रतिनिधी, नगर

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी सुरू असलेल्‍या मोफत जनता अपघात विमा योजनेतून १४९ कुटुंबांना सुमारे दोन कोटी ९१ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.

या योजनेंतर्गत शिर्डी मतदारसंघातील आडगाव येथील श्रीमती कमलाबाई आप्‍पासाहेब शेळके व खडकेवाके येथील योगेश अशोक गायकवाड यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि अपघातात अपगंत्‍व आलेले राहाता येथील अरुण सीताराम लुटे यांना एक लाख रुपयांचा धनादेश आमदार राधाकृष्ण विखे यांच्‍या हस्‍ते देण्‍यात आला.

शिर्डी विधानसभा मतदार संघ आणि परिसरातील अन्‍य गावांसाठी जनता अपघात विमा योजनेची सुरुवात खासदार डॉ. सुजय विखे यांच्‍या संकल्‍पनेतून करण्‍यात आली आहे. या योजनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. एखाद्या व्‍यक्तीचा अपघातात मृत्‍यू झाल्‍यास त्‍यांच्‍या कुटुंबियांना दोन लाख रुपये तर अपंगत्व आल्‍यास १ लाख रुपयांचे अर्थसहाय योजनेत अंतर्भूत करण्‍यात आले आहे. यासाठी विखे परिवाराने जनसेवा फाउंडेशन, पायरेन्‍स आणि प्रवरा सहकारी बँक या तीन संस्‍थांच्‍या सहकार्याने मतदारसंघातील सुमारे एक लाख ४७ हजार ३४६ नागरिकांचा विमा उतरविला आहे. या विम्‍याच्या हप्त्याची रक्‍कम विखे परिवाराने सामाजिक बांधिलकीच्‍या भावनेतून मागील पाच वर्षांपासून भरली आहे. आजपर्यंत १४९ कुटुंबियांना या योजनेचा प्रत्‍यक्ष लाभ झाला आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातून २ कोटी ९१ लाख रुपयांचे वितरण झाले असल्‍याचे आ. विखे यांनी सांगितले. एखाद्या मतदारसंघामध्‍ये नागरिकांसाठी जनता अपघात विमा योजना सुरू करणारा शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा देशपातळीवर एकमेव असून, सामाजिक बांधिलकीतून या योजनेची अंमजबजावणी होत असल्‍याचे त्‍यांनी आवर्जून नमूद केले.

कोट

एखाद्या अपघाताच्‍या घटनेत मृत्‍यू पावलेल्‍यांच्या कुटुंबियांचे सांत्‍वन करण्‍यापलीकडे कोणतीही गोष्‍ट घडत नाही. परंतु या मोफत जनता अपघात विमा योजनेच्‍या माध्‍यमातून या कुटुंबियांना प्रत्यक्ष मदत करता येत असल्‍याचे समाधान महत्त्वाचे आहे.

-राधाकृष्ण विखे

आमदार, शिर्डीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Uddhav Thackeray On Maharashtra Budget 2021: Uddhav Thackeray: महाराष्ट्र मोठी भरारी घेईल!; मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला दिला ‘हा’ विश्वास – maharashtra will take a...

हायलाइट्स:कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक चालना मिळणार.महाराष्ट्र येत्या वर्षात मोठी भरारी घेईल, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास.करोना काळातही १...

खोट्या कारणांचा विनाकारण आधार…

: केलंय म्हणजे मूल जन्माला घालायलाच हवं, हा समज खोडून काढत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महिलांनी जाणीवपूर्वक मूल न होऊ देण्याचा...

water of sewage treatment plant: ‘एसटीपी’चे पाणी होणार आणखी शुद्ध – water of sewage treatment plant will be further purified by aurangabad municipal corporation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेकडून येत्या काळात सीवरेज ट्रीटमेंट प्लांटचे (एसटीपी) पाणी अधिक शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार...

Recent Comments