Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : नगरमध्ये दमदार पाऊस - heavy rain in the...

ahmednagar news News : नगरमध्ये दमदार पाऊस – heavy rain in the city


म.टा.प्रतिनिधी, नगर

नगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने गुरुवारी रात्री हजेरी लावली. नगरमध्ये गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होता. शुक्रवारी दुपारनंतरही शहरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मात्र अगोदरच खड्डेमय असणाऱ्या शहरातील रस्त्यांची आणखी दुरवस्था झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात २४ तासांत सुमारे २९६ मिलिमीटर पाऊस पडला. सर्वाधिक ६६ मिलिमीटर पाऊस अकोले तालुक्यात झाला. त्याखालोखाल नगर शहर व तालुक्यात ५७ मिलिमीटर पाऊस झाला.

गुरूवारी रात्री नगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. काही भागात संततधार, तर काही भागात जोरदार पाऊस पडला. अनेक तालुक्यांमध्ये आठ दिवसांच्या खंडानंतर पावसाने आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नगरमध्ये रात्रभर झालेल्या या पावसाने रस्त्यांवर तसेच सखल भागात पाणीच पाणी साचले होते. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले होते. पावसाने सीना नदी ही दुथडी भरून वाहिली. या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असून खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. याशिवाय यापूर्वी पेरण्या केलेल्या पिकांना तसेच फळबागांनाही या पावसाचा फायदा होणार आहे.

मागील वर्षी १ जून ते २६ जून याकाळात जिल्ह्यात सरासरी ९० मिलिमीटर म्हणजेच १८ टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यातुलनेत यंदा दुप्पट पाऊस झाला आहे. यंदा २६ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९९ मिलिमीटर म्हणजेच जवळपास ३९ टक्के पाऊस झाला आहे.

एकाच दिवसात २९६ मिलिमीटर

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सहा ते शुक्रवारी सकाळी सहा या २४ तासांत तब्बल २९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ६६ मिलिमीटर पाऊस अकोले तालुक्यात झाला आहे. त्याखालोखाल नगर शहर व तालुक्यात ५७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. याशिवाय संगमनेर, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा व कोपरगावमध्ये प्रत्येकी ११ मिलिमीटर, श्रीरामपूर २३, राहुरी १७, नेवासा २०, राहाता ४१, शेवगाव २, पाथर्डी १ व जामखेड तालुक्यात १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दुपारनंतरही जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

राज्यपालांची ‘सक्रिय लुडबूड’ संविधानविरोधी!

अ‍ॅड. सुरेश पाकळे संविधानाने स्थापन केलेल्या लोकशाही संस्थांमध्ये, आपसांत संघर्ष होण्याची स्थिती, भारतात अनेक वेळा येत असते. राज्याचे व मुख्यमंत्री यांचे नेमके...

vaccination in aurangabad: करोना लसीकरणासाठी ३७३ ठिकाणे निश्चित – municipal corporation has identified 373 places for vaccination

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनावरील आजारावरील लसीकरणासाठी महापालिकेने ३७३ ठिकाणे निश्चित केली आहेत. व्हॅक्सीनेटरची नावे देखील ठरविण्यात आली असून, ही सर्व माहिती पालिकेने शासनाला...

Recent Comments