Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : नगरला मान्सूनपूर्वीच १८ टक्के पाऊस - the city...

ahmednagar news News : नगरला मान्सूनपूर्वीच १८ टक्के पाऊस – the city received 18 percent rainfall before the monsoon


म.टा. प्रतिनिधी, नगर

नगर जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच वार्षिक सरासरीच्या १८ टक्के पाऊस झाला आहे. मे मध्ये फारसा पाऊस झाला नसला तरी आता जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नगर जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर याकाळात सरासरी ५१५ मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. मागील वर्षी जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. यंदाही जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्येच जिल्ह्यात सरासरी ९४ मिलिमीटर म्हणजेच जवळपास १८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी २६ मिलिमीटर म्हणजे अवघ्या ५ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल १३ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

यंदा जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये अकोले तालुक्यात १३४ मिलिमीटर, संगमनेर ८३ मिलिमीटर, कोपरगाव १२६ मिलिमीटर, श्रीरामपूर १५० मिलिमीटर, राहुरी १४३ मिलिमीटर, नेवासा ७२ मिलिमीटर, राहाता ७१ मिलिमीटर, नगर ७६ मिलिमीटर, शेवगाव ८० मिलिमीटर, पाथर्डी ४१ मिलिमीटर, पारनेर १२३ मिलीमीटर, कर्जत १०१ मिलिमीटर, श्रीगोंदा ६४ मिलिमीटर व जामखेड तालुक्यात ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

B१०४ टँकरने पाणीपुरवठाB

जून महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू झाला असला तरी टँकर मात्र बंद झालेले नाहीत. जिल्ह्यातील ९७ गावे व ४३६ वाड्यावस्त्यावरील नागरिकांना टँकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांना दररोज १०४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात सर्वात जास्त टँकर नगर जिल्ह्यात सुरू आहेत. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर या पाच जिल्ह्यापैकी सध्या नाशिक जिल्ह्यात ५२, नंदुरबार जिल्ह्यात १ व नगर जिल्ह्यात १०४ टँकर सुरू आहेत. इतर दोन जिल्ह्यात एकही टँकर नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘त्यांची’ झेप देहविक्रीकडून आत्मनिर्भरतेकडे

: ग्राहकाची वाट पाहणे हे व्यावसायिकाचे नशीबच असते. त्याला कुणीही अपवाद नाही, अगदी देहविक्रय करणाऱ्या महिलादेखील. परंतु, करोनासारख्या साथीमुळे 'सुरक्षित वावरा'चा नारा...

devendra fadnavis covid positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; राऊत म्हणाले… – sanjay raut wishes devendra fadnavis for speedy recovery

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. संजय राऊत यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी 'फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी...

Recent Comments