Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: पतसंस्थांना ऑनलाइन बैठका घेण्यास मंजुरी - credit unions are...

ahmednagar news News: पतसंस्थांना ऑनलाइन बैठका घेण्यास मंजुरी – credit unions are allowed to hold online meetings


‘पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यालयात ये-जा करणे शक्य होत नाही…

Updated:

MT

नगर : ‘पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यालयात ये-जा करणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्यातील पतसंस्थांच्या डिजिटल माध्यमांद्वारे मासिक बोर्ड मिटींग घेऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यास सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी परवानगी दिली आहे,’ अशी माहिती नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन वसंत लोढा यांनी दिली.

लोढा यांनी सांगितले की, सहकार विभागाच्या नियमानुसार सर्व सहकारी पतसंस्थांना संचालक मंडळाची दरमहा बैठक घेणे बंधनकारक आहे. लॉकडाउनमुळे हे शक्य होत नव्हते. त्यामुळे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनने सहकार आयुक्तांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार सहकार आयुक्त कवडे यांनी परिपत्रक काढून सहकारी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे किंवा डिजिटल माध्यमांद्वारे मासिक बोर्ड मिटींग घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा बैठकांचा डाटा सुरक्षित करणे आवश्यक आहे. जे संचालक, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष बैठकीला हजर असतील, त्यांनी मास्क लावून सुरक्षित वावर ठेवत बैठकीत सहभागी होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

cricket news News : ‘भारताचा कसोटी मालिकेत ४-० असा पराभव होणार’ – india tour of australia 2020 india will lose 4-0 in test series...

नवी दिल्ली: india tour of australia 2020सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिका खेळणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी...

Recent Comments