Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणाची मागणी - demand for insurance...

ahmednagar news News: पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणाची मागणी – demand for insurance cover for animal husbandry workers


नगर : ‘करोना’ व्हायरसच्या संकटकाळात पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. या काळात जोखीम पत्करून ग्रामीण भागातील जनावरांची काळजी घेत आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा विमा संरक्षण मिळावे,’ अशी मागणी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने राज्याच्या ग्रामविकासमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक या काळात आजारी जनावरांवर औषधोपचार करीत आहेत; तसेच पशुपालकांना आवश्यक मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सरकारने विचार करणे आवश्यक आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुढील ९० दिवसांसाठी किमान १ कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर सोनावळे, सचिव डॉ. नितिन निर्मळ, डॉ. संजय कढणे आदींनी केली आहे.

दरम्यान, या काळात राज्य सरकारने आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्रासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे या काळात पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांकडून कोणतेच शुल्क घेऊ नये, अशीही मागणी या निवेदनात केली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, जाणून घ्या कारण – ind vs aus first odi australia can...

नवी दिल्ली: भारतीय संघ आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्यापासून म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. भारताच्या दौऱ्याची...

gujarat coronavirus: एक अॅम्ब्युलन्स अन् चार मृतदेह… गांधीनगरमध्ये करोनाने होणारे मृत्यू लपवले जाताहेत? – gujarat coronavirus dead bodies in ambulance photo viral nitin patil...

अहमदाबादः गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ( gujarat coronavirus ) सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल ( viral photo ) होतोय. या व्हायरल फोटोत एका...

Recent Comments