Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: पालिकेच्या अन्नछत्राचा आधार - basis of municipal food shed

ahmednagar news News: पालिकेच्या अन्नछत्राचा आधार – basis of municipal food shed


दोन ठिकाणी सुविधा सुरू; बाराशे जणांना जेवण

म. टा. प्रतिनिधी, नगर

महापालिकेने सुरू केलेल्या अन्नछत्राचा रोज तब्बल बाराशेजणांना आधार झाला आहे. गरीब कुटुंबांतील सातशेहून अधिक जण रोज दुपारी महापालिकेच्या अन्नछत्रात जेवतात तर पाचशेवर फूड पार्सल शहरातील विविध भागांतील गरिबांपर्यंत महापालिकेद्वारे पोहोचवले जात आहेत. नगर-कल्याण रस्त्यावरील जाधव लॉन व नगर-मनमाड महामार्गावरील संजोग हॉटेल अशा दोन ठिकाणी महापालिकेने कम्युनिटी किचन उपक्रम सुरू केला आहे.

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाउन’मुळे कामधंदे बंद झाल्याने हातावर पोट असणारांचे हाल सुरू आहेत. यापैकी अनेक कुटुंबांना किराणा साहित्य विविध संस्थांनी दिले आहे. तर काही संस्थांनी तयार अन्न करून फूड पार्सलद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. या सेवेत आता महापालिकाही सक्रिय झाली आहे. जाधव लॉन येथे आठवड्याभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या कम्युनिटी किचन योजनेत रोज ७०० जणांचे अन्न तयार होते. यापैकी तीनशे अन्न पाकिटांचे शहरात वाटप होते तर कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर व परिसरातील चारशेहून अधिक गरीब नागरिक रोज येथे जेवण करण्यासाठी येतात. रविवारी संजोगमध्ये असे कम्युनिटी किचन सुरू केले गेले व तेथे तयार करण्यात आलेल्या पाचशेहून अधिक जणांसाठीच्या अन्नापैकी नागापूर-बोल्हेगाव परिसरातील गरीब चारशे जणांना अन्न पाकिटे पोहोचवली गेली.

शहरातील गरीब व गरजूंना भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे किट पुरवण्यासाठी महापालिकेने हेल्पलाइन उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय, काही गरीब नागरिकांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असल्याने त्यांच्याशी कम्युनिटी किचन उपक्रम सुरू केला गेला आहे. आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाचे व्यवस्थापन यंत्र अभियंता परिमल निकम पाहतात. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने रोज सकाळी भाजी खरेदी होते तसेच दानशुरांच्या मदतीने गहू व पीठ संकलित करून पोळी-भाजीचे फूड पार्सल तयार होते. गरिबांपर्यंत तो पोहोचवण्याच्या कामाचे व्यवस्थापन उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्यासह आरोग्याधिकारी डॉ. नरसिंग पैठणकर, अभियंता रोहिदास सातपुते, वैभव जोशी व गणेश रोहोकले, पाणीपुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे, शहर अभियंता सुरेश इथापे, प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहेत्रे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन आदींसह मुख्य स्वच्छता निरीक्षक कुमार सारसर, विजय बोधे, राजेंद्र सामल, तुकाराम भांगरे, सुनील जगताप, जी. एस. धोंगडे, गोरख देठे, मुकुंद वैराळ, दिगंबर कोंडा आदी मंडळी करतात.

भारत भारतीची झाली ओळख

संजोग हॉटेलमधील महापालिकेचे कम्युनिटी किचन उद्योजक प्रदीप पंजाबी यांच्या सहकार्याने सुरू झाले आहे. आयुक्त मायकलवार यांनी रविवारी येथे भेट देऊन तयार होत असलेल्या अन्नपदार्थांची माहिती घेतली. या वेळी नगर शहरात सामाजिक काम करीत असलेल्या भारत भारती संस्थेची माहितीही त्यांनी घेतली. भारत भारतीचे अध्यक्ष राजू लक्ष्मण, के. के. शेट्टी, वाल्मिक कुलकर्णी, अशोक मवाळ, दिनेश छाब्रिया, संजय आहुजा या वेळी उपस्थित होते. ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेद्वारे सुरू असलेल्या सामाजिक कार्यात सहभागाचे आवाहन या वेळी मायकलवार यांनी भारत भारतीच्या पदाधिकाऱ्यांना केले. त्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच संस्थेद्वारे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Fawad Ahmed: करोना प्रोटोकॉलची ऐशी तैशी; बायो बबलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूला करोना – after fawad ahmed of australia was infected with kovid 19 pcb’s bio...

हायलाइट्स:क्रिकेटपटू फवाद अहमद याला बायो बबलमध्ये असताना करोनाची लागणतो सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळत आहेपाक बोर्ड बायो-बबल प्रोटोकॉल नीट ठेवण्यात अपयशीकराची: पाकिस्तानमध्ये...

शेतकरी आंदोलनावर गप्प का आहेस?; मुंबईत रोखली अजय देवगणची कार – man held for blocking ajay devgn’s car over actor’s silence on farmers’ protest

मुंबई: केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात ( farm laws ) शेतकऱ्यांचे आंदोलन ( farmers protest ) सुरूच आहे. या आंदोलनला काही सेलिब्रिटींनी...

Kangana Ranaut: kangana ranaut : शिवसेना नेत्यांकडून जिवाला धोका, कंगनाची सुप्रीम कोर्टात धाव – kangana ranaut in supreme court seeking transfer criminal cases

नवी दिल्लीः मुंबईत दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत ( kangana ranaut ) आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी आता सुप्रीम कोर्टात...

Recent Comments