Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : फेसबुक पोस्ट तरुणीला महागात - facebook post expensive...

ahmednagar news News : फेसबुक पोस्ट तरुणीला महागात – facebook post expensive for a young woman


केडगावमधील ‘त्या’ वादग्रस्त महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, नगर

लॉकडाउनच्या काळात जळगावमध्ये जावून महिलेला मारहाण करणाऱ्या तरुणीने पोलिसांच्या नावाचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शबनम मोमीन उर्फ शमिना गफूर मोमीन हिने (रा. केडगाव देवी रोड, नगर) पोलिस नसताना पोलिस खात्यात नोकरीला असल्याची माहिती, पोलिस गणवेशातील फोटो स्वतःच्या फेसबुकवर अकाउंटवर ठेवला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून तिच्याविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिने मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले असल्य़ाची माहिती पोलिसांनी दिली.

शबनम मोमीन हिच्याविरुद्ध गेल्या आठवड्यात जळगावमधील अंमळनेर पोलिस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. लॉकडाउन असताना ही महिला दुचाकीवरून जळगाव जिल्ह्यात गेली होती. कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्याविरुद्ध पोलिस महानिरीक्षकांकडे केलेली तक्रार मागे घे, म्हणून जळगावमधील महिलेला मारहाण केली होती. आता या महिलेने पोलिसांच्या नावाचा, गणवेशाचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेविरुद्ध कोतवालीचे गोपनीय शाखेला नियुक्तीला असलेले पोलिस कॉन्स्टेबल तन्वीर सलीम शेख यांनी सायबर पोलिस स्टेशनला माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. शबनम मोमीन या महिलेने तिच्या फेसबुक अकाउंटवर वर्क अॅट महाराष्ट्र पोलिस अशी माहिती टाकली आहे. पोलिस शिपाईपदाचा गणवेश परिधान केलेला फोटो फेसबुकवर टाकला असल्याची माहिती एका व्यक्तीकडून शेख यांना मिळाली होती. त्यानुसार शेख यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून संबंधित महिलेचे फेसबुक अकाउंट शोधले. त्यात महिलेचे पोलिस गणवेशात फोटो असल्याचे दिसून आले. २०१८पासून पोलिस दलात नोकरीला असल्याची माहिती फेसबुकवर टाकली आहे. पोलिस ऑफिसरची कॅप घातलेली, पोलिस शिपायाचा गणवेश व हातामध्ये पुस्तके असलेली, दुचाकी बसलेली अशा वेगवेगळी छायाचित्रे फोटो फेसबुकवर शेअर केलेले आढळून आले. त्यानंतर शेख याने सायबर पोलिस स्टेशनला महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता, महाराष्ट्र पोलिस दलात नोकरीला असल्याचे भासवून तोतयागिरी करून फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांकडून सखोल तपास

या महिलेने २०१६ ते २०१८ याकालावधीत पोलिसाचा गणवेश घालून फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत. स्वता:च्या नावाची नेमप्लेट तयार केली आहे. या महिलेने पोलिस असल्याचे भासवून नागरिकांना फसविले आहे का? याबाबत सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून मिळाली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : एनसीबीचे आरोपपत्र – sushant singh rajput death case : first charge sheet has filed in sushant...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करत असतानाच त्यात काही व्हॉट्सअॅप संभाषणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे रॅकेट उजेडात आल्याने नार्कोटिक्स...

Recent Comments