Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : ‘भाकप’ने पाळला मागणी दिन - the cpi (m)...

ahmednagar news News : ‘भाकप’ने पाळला मागणी दिन – the cpi (m) complied with the demand


नगर : देशात विविध भागात अडकून पडलेल्या स्थलांतरीत कामगार व विद्यार्थ्यांना बिनशर्त निशुल्क त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी, त्यांना घरी पाठविण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नियम व अटी शिथिल करुन त्यांना प्रवासासाठी बसेस व रेल्वेच्या संख्येत वाढ करावी, अशा विविध मागण्या करीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी ‘मागणी दिन’ पाळला. पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयास आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवले आहे.

करोना संकटाशी झुंजताना स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, सुक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिक, आरोग्य सेवक, महिला, नागरिक, शेतकरी, शेतमजुरांकडे विशेष लक्ष देण्यात येत नसल्याबद्दल, तसेच राज्याना आर्थिक अडचणीत ढकलण्यात येत असल्याच्या निषेधार्थ भाकपने सोमवारी देशव्यापी मागणी दिन पाळण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नगरमध्येही हा दिन पाळण्यात आला असून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सरकारला पाठवण्यात आले आहे, अशी माहिती भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी दिली. पहिल्यांदा अचानक घोषणा करण्यात आलेल्या तीन आठवड्याच्या लॉकडाउनमुळे स्थलांतरितांचे विशेषत: कामगार व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू झाले होते. त्याचवेळी चार ते पाच दिवसांची मुदत देऊन नंतर लॉकडाउन घोषित झाला असता, तर त्या काळात हे सर्वजण आपापल्या गावी पोहचू शकले असते. परंतु २१ दिवसांचा लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा लॉकडाउनची मुदत तीन मे पर्यंत व नंतर पुन्हा १७ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. आता या स्थलांतरीत कामगार व विद्यार्थ्यांसाठी सशर्त घरी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने घरी जाण्याची इच्छा असून देखील ते अडकून पडल्याने त्यांच्या घरी पोहचण्यासंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही पक्षाने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पक्षाने केलेल्या विविध मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात, अशी मागणीही राज्य सहसचिव सुभाष लांडे, स्मिता पानसरे, बन्सी सातपूते, शांताराम वाळूंज, आझाद ठुबे, उज्ज्वला ठुबे, सुधीर टोकेकर, संतोष खोडदे, भारती न्यायपेल्ली, भैरवनाथ वाकळे, बाबा आरगडे, कारभारी उगले, शंकर न्यालपेल्ली, डॉ. राधेश्याम गुंजाळ, अनिल कढणे, भारत आरगडे, लक्ष्मण नवले, रामदास वागस्कर, संजय नांगरे आदींनी केली आहे.

…..

भाकपच्या या आहेत मागण्याः

– रोहयो मजूर व शेतमजुरांना मनरेगाची कामे, थकीत वेतन व तातडीची मदत मिळावी.

– सरकारच्या गोदामात पडून असलेला धान्याचा साठा गरजूंना मोफत द्यावा.

– करोना संकट काळात सेवा देणारे डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, अंगणवाडी-आशा कर्मचारी आदींच्या जीविताची हमी सरकारने घ्यावी.

– करोनाची लाट थांबविण्यासाठी राज्याची थकबाकी, आवश्यक निधी केंद्र सरकारने राज्य सरकारला द्यावा.

– ग्रामीण अर्थव्यवस्था व शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थिीतीकडेही केंद्र सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्यांना एकरी तर शेतमजुर कामगारांना सात हजार रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे.

…..Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: एनसीबीकडून आरोपपत्र दाखल, रिया आणि शौविकही आरोपी – ncb files chargesheet against 33, including rhea chakraborty sushant singh rajput drugs...

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तीस हजार पानांचं हे आरोपपत्र असल्याची माहिती समोर आली...

motorola moto g10: Moto G10 आणि Moto G30 ची लवकरच होणार भारतात एन्ट्री, कंपनीने शेयर केला टीजर – moto g10 and moto g30 india...

हायलाइट्स:मोटोरोला कंपनी दोन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच करणार Moto G10 आणि Moto G30 असे स्मार्टफोनचे नाव याआधी मोटोरोला कंपनीने या फोनला युरोपमध्ये...

Aurangabad Corona Update: Coronavirus : दोन मृत्यू, ३५७ नवे बाधित – aurangabad reported 357 new corona cases and 2 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहरातील शिवाजीनगर येथील ८३ वर्षीय, तर जालना जिल्ह्यातील तळणी येथील ६० वर्षीय, अशा दोन बाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू...

Recent Comments